Friday, September 13, 2024

‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील’

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. असे म्हणत भाजपा (BJP) चे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी राष्ट्रीय राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला म्हणाले होते, तसंच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासनही मला स्वतः अमित शाहांनी (Amit Shah) दिलं होतं.’ तसंच, ‘देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा’, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत.

“पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, १०० कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले, मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला. याला कोडगेपणा म्हणतात”, लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की, असेही ते म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की”, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा… ‘या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’

अन्य लेख

संबंधित लेख