Sunday, November 24, 2024

छगन भुजबळ – शरद पवारांच्या भेटीवर बावनकुळे स्पष्टच बोलले

Share

मुंबई : राष्ट्रवादी काँगेसचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, हि भेट राजकीय नसल्याचे भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
 
बावनकुळे म्हणाले की, “राज्यातील सामाजिक आणि विकासात्मक चर्चा करण्यासाठी कधीतरी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचे नेते एकमेकांना भेटत असतात. त्यामुळे छगन भुजबळ आणि शरद पवारांची भेट कोणत्या कारणामुळे होत आहे, ते भुजबळ साहेब सांगतील. भुजबळ हे महायूतीचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्यामुळे महायूतीला धोका निर्माण होईल, असा कुठलाही निर्णय ते घेणार नाहीत. महायूती कशी एकत्र राहील यासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात. आम्ही देखील शरद पवार साहेबांना अनेकदा भेटलो आहोत. त्यामुळे या भेटीमागे काहीही राजकीय कारण समजू नये,” असं ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख