वर्ष २०२५ हे ख्रिश्चन धर्माचे २०२५वे वर्ष म्हणून जगभरातील ख्रिस्ती समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. आज जगातील सुमारे ३०% लोकसंख्या—म्हणजे २.३ अब्ज लोक—ख्रिस्ती आहेत.
परंतु गेल्या दोन हजार वर्षांत हा धर्म केवळ सेवा, प्रेम आणि उपकारांच्या संदेशाने पसरलेला नाही. ख्रिस्ती प्रसाराच्या इतिहासात अनेक राजसत्तांचा वापर, विविध पेगन संस्कृतींचा नायनाट, विविध खंडांतील सनातनी विचारांना नष्ट करून त्यासाठी लाखो लोकांची अकल्पनीय हत्याकांडे घडवून आणून, साम-दाम-दंड-भेदाची तंत्रे, राजकीय कुटिल डावपेच, क्रूर अत्याचार, मोठ्या प्रमाणातील हत्याकांड, तसेच प्रचार, फसवणूक आणि दबावाच्या असंख्य यंत्रणा वापरल्या गेल्या. हिटलरने केलेला यहुदी नरसंहारही काहींच्या मते ख्रिश्चनिटीच्या काळ्या अध्यायातीलच एक भाग मानला जातो.
इस्लामिक आक्रमकांची रानटी, टोळीबाज परंपरा आपल्याला चांगली ठाऊक असते; परंतु ख्रिस्ती धर्मप्रसाराचा काळा इतिहास बहुतेकांना माहित नाही. आज चर्च हीही जागतिक बाजारशक्तींच्या जाळ्यातील एक अत्यंत प्रभावशाली संस्था आहे—जिचे ध्येय भारतासारख्या देशांची सर्व शक्य प्रकारे पिळवणूक करणे, असे बरेचदा समोर येते. जगभरातील इतर जागतिक संरचनांचा—सांस्कृतिक मार्क्सवाद, पर्यावरणवादाचा आडोसा, फिल्म उद्योग, NGO नेटवर्क—असा पूर्ण वापर यांच्याकडून केला जातो.
चर्चची मूळ संरचना — एक ‘Framework’
चर्च म्हणजे फक्त प्रार्थनास्थळांच्या इमारती नव्हेत. तर त्यात—
- विविध पदाधिकारी, त्यांचे पदानुक्रम,
- निर्णय-प्रक्रिया,
- आर्थिक पुरवठ्याच्या पद्धती,
- ख्रिस्ती विचारांचा प्रसार करण्यासाठी उभारलेली संस्था-जाळी,
- प्रशिक्षण केंद्रे,
- सेवा कार्यांची संरचना,
- कायदे व दबावतंत्रांचा वापर करून निर्माण केलेले संरक्षण कवच,
- सरकारसोबत असणारे सर्व प्रकारचे हितसंबंध
- तसेच स्थानिक ते आंतरराष्ट्रीय अशा विघातक व अराजकतावादी घटकांशी जोडलेले दुवे
ही संपूर्ण परिसंस्था म्हणजेच चर्चचे ‘framework’ आहे. धर्मप्रसारासाठी जिथून प्रचंड पैसा येतो, तो कोण आणते? टूलकिट कोण बनवते आणि का? ‘असंतांचे संत’ हा मदर तेरेसांवरील लेख अचानक जोकसत्ताने काढून घेतला, का? नन्सवरील अत्याचार करणारे पाद्री आणि बिशप दंडमुक्त कसे राहतात? दिवसाढवळ्या सुरू असलेल्या धर्मांतराच्या मोहीमांवर कोणतीही कायदेशीर कारवाई का नाही? अंधश्रद्धा निर्मूलन संस्थांना यांच्याकडे प्रश्न का पडत नाहीत?—अशा प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात.
धर्मांतराचे तंत्र — कमजोरांचे शोषण
चर्च ही कोणती अध्यात्मिक तत्त्वज्ञानावर आधारित संस्था नाही. भारतीय धार्मिक संकल्पना स्वतःच्या अंतर्मुख आध्यात्मिकतेकडे झुकतात. त्यामुळे सनातनी विचारसरणीचा साधासुधा हिंदू समाज मिशनऱ्यांच्या डावपेचांना सहज बळी पडतो.
शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, सामाजिक आणि राजकीय—सर्व प्रकारच्या कमकुवतपणांचा अभ्यास करून लोकांना आपल्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी चर्चने एक अत्यंत कौशल्यपूर्ण व्यवस्था उभी केली आहे. गेली दोन-अडीच हजार वर्षे युरोपीय राजसत्ता आणि धर्मसत्ता यांनी ज्या पद्धतीने असंख्य संस्कृतींचा नाश केला, त्या तंत्रांचा वापर आजही मिशनऱ्यांकडून होताना दिसतो. इस्लाम किंवा कम्युनिझम या विचारसरण्याही ख्रिश्चनिटीचेच भिन्न मुखवटे आहेत, असेही इतिहासात दिसून येते.
ख्रिस्ती डेनॉमिनेशन्स — ४५,००० पेक्षा जास्त!
एकाच देव, ट्रिनिटी, बायबल आणि जिजसवर विश्वास ठेवणारी मंडळी एवढ्या ४५,००० उपपंथांत का विभागली गेली? कारण धर्माचे व्यावसायिकीकरण.
ख्रिश्चनिटी MLM—multi-level marketing—मॉडेलसारखे कार्य करते. अनुयायी, पैसा आणि जागतिक राजकीय सत्ता वाढवत राहणे हेच प्रमुख उद्दिष्ट. त्यामुळेच भारतातील निवडणुकांमध्ये चर्चमार्फत मतांचे दिशादर्शन केले जाते. लोकांना देश, विकास किंवा शांती यांवर नव्हे, तर चर्चच्या हितानुसार मतदान करण्यास प्रवृत्त केले जाते. हे धार्मिक कार्य कसे मानावे?
ईशान्य भारतातील भूमिका
- धर्मांतरितांना फुटीरतावादी बनवण्यात चर्चचा सहभाग सिद्ध झालेला आहे.
- मिझोराममध्ये चर्चच्या भूमिकेमुळे ५०–६० हजार रियांग जनजातीला राज्य सोडावे लागले आणि ते आजही परतण्यास घाबरतात.
- ‘नागालिम फॉर ख्राईस्ट’सारखी उघड फुटीरतावादी चळवळ चर्चशी संबंधित संस्थांमधूनच जन्माला आली.
लोकांचा स्वाभिमान, स्वावलंबन, अस्मिता मोडून त्यांना केवळ ‘वापरायची साधने’ बनवणे—हीच चर्चची मूलभूत यंत्रणा आहे. ‘सेक्युलरिझम’ आणि ‘टॉलरंट सोसायटी’ यांसारखी शब्दसंपदा या विचारसरणीचीच देणगी आहे.
चर्चच्या वास्तू — गरिबीतही भव्य!
ईशान्य भारतात, विशेषतः ख्रिस्तीबहुल भागांत, चर्चची इमारत नेहमीच गावातील सर्वात श्रीमंत आणि सुंदर.
गावात झोपडीच्या घरांची भर असली तरी चर्च मात्र—
- गिटार, ड्रम्स,
- अत्याधुनिक साउंड सिस्टीम,
- गालिचे,
- देखणी बैठकव्यवस्था
आदींनी सजलेले.
स्थानिक पाद्री सर्वात चलाख, प्रशिक्षणप्राप्त असतील याची काळजी घेतली जाते. गावात कोणी नवीन आले तर त्याची माहिती तात्काळ चर्चकडे पोहोचवली जाते.
चर्चकडे प्रचंड जमीनसंपत्ती
- कॅथलिक चर्चकडे भारतात १७.२९ कोटी एकर (७ कोटी हेक्टर) जमीन आहे.
- मूल्य सुमारे २०,००० कोटी रुपये.
- रिअल इस्टेटमध्ये चर्च हे एक मोठे राष्ट्रीय शक्तिकेंद्र.
- जमीन, व्यवहार, कायदे आणि दरांवर प्रभाव.
‘सरकार कोणतेही असो—सत्ता आमचीच’ ही प्रौढी याच मालमत्तेमुळे येते.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील नियंत्रण
२०१२ च्या आकडेवारीनुसार कॅथलिक चर्चकडे—
- २,४५७ रुग्णालये,
- २४० मेडिकल/नर्सिंग कॉलेजेस,
- २८ सामान्य महाविद्यालये,
- ५ अभियांत्रिकी महाविद्यालये,
- ३,७६५ माध्यमिक, ७,३१९ प्राथमिक शाळा,
- ३,१८७ नर्सरी शाळा
सरकाराच्या वळचणीला राहून आपला खेळ मांडायचा इतिहास असणाऱ्या चर्च व्यवस्थेला अपार जमीन ब्रिटिश काळात प्राप्त झाली.
१९२७ च्या ‘Indian Church Act’ ने मोठ्या अनुदानांची सोय केली. 1960 मध्ये हा कायदा बदलला, पण चर्च सरकारच्या नियंत्रणाखाली जाणार नाहीत, अशी तरतूद मात्र कायम ठेवली गेली. म्हणजे मंदिरे हिंदू समाजाच्या नाही तर सरकारच्या ताब्यात जातात. पण चर्च मात्र कोणत्याही विचारसरणीचे सरकार आले, त्यांनी काहीही कायदे केले तरी अळवावरच्या पाण्यासारखे अलगदपणे सुखनैव स्वतंत्र व्यवहार करण्यास मुक्त आहेत.
धर्मांतर आणि जमीन मालकी यांचा परस्पर संबंध
- शाळा/रुग्णालयांतून मोफत सेवा देऊन धर्मांतर,
- आदिवासी जमिनी बळकावणे,
- नक्षलप्रभावित भागात जोरजबरदस्तीने धर्मांतर केल्याच्या घटनांचे पुरावे ईशान्य भारतापासून रेड कॉर्रिदोराच नाही तर पंजाब आणि इतर भागांतही सापडतात. अश्या अनेक प्रकरणांमुळे चर्चच्या ‘लँड ग्रॅब’ यंत्रणेची क्रूर, खुनशी, राक्षसी बाजू उघड होते.
चर्चची पदानुक्रम संरचना
इथे केवळ भारतातील कॅथलिक चर्चचा पसारा आणि व्यवस्था मांडत आहे. असाच पसारा बाकीही सर्व ख्रिस्ती पंथ विशेषांचा आहे. यावरून भारतातील किती मोठी जनता यांच्या मुठीत गेली आहे, ते समजून येईल.
कॅथलिक चर्चमध्ये ‘Three Orders’ आहेत—
Deacon → Priest → Bishop
भारतात (२०२५):
- १३२ लॅटिन डायोसीज,
- ५,३४० बिशप्स,
- १५,०००+ प्रीस्ट.
पोप फ्रान्सिस यांच्या एप्रिल २०२५ मधील निधनानंतर नवीन पोपच्या निवडणुकीसाठी भारतातील ६ कार्डिनल्सपैकी ४ लोकांना मतदार म्हणून निवडले गेले होते. यात पहिल्यांदाच दलित कार्डिनलचा समावेश केला गेला. आणि हे केवळ तेलंगणा–आंध्र प्रदेशातील व्यापक दलित धर्मांतरणाच्या राजकीय हेतूसाठी केले गेले आहे. ख्रिस्ती धर्मात जातीवाद नाही, हा दावा अशारितीने खोटा ठरतो. जोशुआ प्रकल्पाचे संदर्भ पाहिल्यास भारतीय समाजरचनेबद्दल मिशनऱ्यांचा अभ्यास किती खोलवर आहे, हे जाणवते.
१. डायाकन (Deacon)
- जबाबदाऱ्या: मासमध्ये सहाय्य, सामाजिक सेवा, विवाह/अंत्यसंस्कार.
- वय: ३५+.
- पगार: ₹१०,०००–₹१५,००० + निवास.
- शिक्षक असल्यास ₹२०,०००+.
- २०२४ पासून TDS लागू.
२. प्रीस्ट (Priest)
- भूमिका: मास, बाप्तिस्मा, कन्फेशन, पॅरिशचे व्यवस्थापन.
- प्रशिक्षण: ७–८ वर्षे.
- पगार: ₹१८,०००–₹२८,००० + सुविधा.
- SVD प्रीस्ट: सरासरी ₹७२,७७०/महिना.
३. बिशप (Bishop)
- जबाबदारी: संपूर्ण डायोसीज, प्रीस्ट नियुक्ती, धोरणनिर्मिती.
- नियुक्ती: पोपद्वारे.
- पगार: ₹५०,०००–₹१,००,००० + भत्ते.
४. आर्चबिशप/कार्डिनल
- भूमिका: अनेक डायोसीजचे नेतृत्व, पोपला सल्ला.
- पगार: ₹१,००,०००+ आणि आंतरराष्ट्रीय प्रवास आणि इतर अनेक सुविधा.
भारतातील प्रमुख चर्च आणि त्यांचे परदेशी मूळ
१. सिरियन ऑर्थोडॉक्स — मूळ: सीरिया/तुर्की (इ.स. ५२)
२. रोमन कॅथोलिक — मूळ: व्हॅटिकन; प्रवेश: पोर्तुगीज (१४९८)
३. CSI — मूळ ब्रिटिश/अमेरिकन; १९४७
४. CNI — ब्रिटिश/अमेरिकन; १९७०
५. बॅप्टिस्ट — अमेरिकन; १८३६
६. ल्यूथरन — जर्मन/डॅनिश; १७०६
७. पेंटेकोस्टल — अमेरिका; १९०७
८. प्रेस्बिटेरियन — स्कॉटलंड/वेल्स; १८३४
त्यामुळे धर्मांतरित व्यक्तींची निष्ठा स्थानिक समाजाशी नसून परकीय शक्तींशी जोडली जाते, हे स्पष्ट होते.
निष्कर्ष
चर्च म्हणजे केवळ प्रार्थनास्थळ नाहीत, तर ती चर्च या विचाराशी जोडले गेलेले लोक, पदसोपान, संस्था, पैसा, धोरणे, कार्यक्रम, सामाजिक-राजकीय यंत्रणा आणि जागतिक नेटवर्क यांनी बनलेली एक प्रचंड, बहुराष्ट्रीय, बहुपरतंत्र संरचना आहे.
ही व्यवस्था केवळ नावाला धार्मिक आहे. जगाला एकजिनसी बनवून संपूर्ण मानवजातीला आपल्या मुठीत ठेवणे हे यांचे उद्दिष्ट आहे, हे तिचे कार्य, इतिहास आणि आजचा या व्यवस्थेचा जगावर असणारा प्रभाव पाहिल्यावर स्पष्ट होते.