Wednesday, January 29, 2025

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Share

काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. दरम्यान, हिरामण खोसकर यांनी लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केलं आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत आमदार हिरामण खोसकर यांचा पक्षप्रवेश पार पडला आहे. दरम्यान, आमदार हिरामण खोसकर यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.खोसकर यांचा नाशिक विभागात विशेषत: आदिवासी समाजात मोठा दबदबा आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला हा दुसरा मोठा प्रवेश आहे.

अन्य लेख

संबंधित लेख