Wednesday, December 4, 2024

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश

Share

कोल्हापुरातील काँग्रेसच्या(Congress) आमदार जयश्री चंद्रकांत जाधव(Jayashri Jadhav)यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव हेदेखील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार होते. जयश्री जाधव यांचा पक्षात प्रवेश झाल्यानंतर त्याना कोल्हापूर जिल्ह्याच्या महिला आघाडी प्रमुख आणि शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

त्यांच्यासह त्यांचे सुपुत्र सत्यजित जाधव यांनीही यावेळी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर उद्योग जगतातील प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडवण्याची इच्छा व्यक्त केल्याने उद्योग जगताचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याना नवीन जबाबदारी देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, मित्रा महामंडळाचे उपाध्यक्ष आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार राजेश क्षीरसागर, शिवसेना उद्योग आघाडीचे अध्यक्ष उदय सावंत तसेच कोल्हापूर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख