“दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावला जाईल” असे मालेगावच्या उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांनी सांगितले आहे.
१९४७ साली आमच्या प्राणप्रिय मातृभूमीच्या विभाजनाच्या वेळी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मुस्लिम लीगला भरघोस मतदान करूनही “अपने वालों का देश” म्हणून रावी पार न जाता. हिंदू बहुल भारतातच राहिलेल्या मुसलमानांना हिंदू समाजात साम दाम दंड भेद नीती वापरून एकरूप करून टाकण्याची सुवर्णसंधी काँग्रेसने गमावली. किंबहुना “अल्पसंख्यांक” या गोंडस संकल्पनेखाली मागे राहिलेल्या मुसलमानांचे सामाजिक आणि धार्मिक वेगळेपण काँग्रेस आपल्या राजकीय लाभासाठी कसोशीने जोपासत राहिली त्यालाच लागलेली ही विषारी फळे आहेत.
हम आपके हैं कौन?

खरं म्हणजे १९४५ साली झालेल्या केंद्रीय विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांनी काँग्रेसचे डोळे उघडायला हवे होते. १०२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ५७ जागा जिंकून भले काँग्रेसने बहुमत मिळवले असले तरी, मुस्लिमांसाठी राखीव असलेल्या ३० मतदारसंघांपैकी “एकाही” मतदार संघात काँग्रेसला विजय मिळवता आला नाही. या सर्वच्या सर्व म्हणजे ३० जागा कायदे आजम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने मारल्या.
या देशातील मुसलमानांना काँग्रेसही आपली वाटावी म्हणून ही निवडणूक काँग्रेसने मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नेतृत्वाखाली लढली होती. १९४० ते १९४६ सलग ६ वर्षे मौलाना अबुल कलाम आझाद काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहूनही मुसलमानांना काँग्रेस आपली वाटली नाही. कारण काँग्रेस अखंड भारताच्या बाजूने होती.
याउलट “आमचा धर्म वेगळा आहे, आमची संस्कृती वेगळी आहे, आमच्या परंपरा वेगळ्या आहेत, आम्ही हिंदूं बरोबर राहू शकत नाही. म्हणून आम्हा मुसलमानांना हिंदुस्थानात वेगळी भूमी हवी” अशी “द्विराष्ट्र सिद्धांता”ची फाळणीची भाषा करणारे कायदे आजम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना संपूर्ण हिंदुस्थानातील मुस्लिम समाजाला आपले वाटले. त्यांनी काँग्रेसकडे ढुंकूनही बघितले नाही कारण, त्यांच्या मते काँग्रेस हा हिंदूंचे नेतृत्व करणारा पक्ष होता. आपला पक्ष तर इस्लामच्या नावावर वेगळी भूमी मागणारा मुस्लिम लीग मुस्लिम बहुल राखीव मतदार संघातील ८७% मुसलमानांनी देशाची फाळणी हव्या असणाऱ्या मुस्लिम लीगला मतदान केले. आणि काँग्रेसचा मतदार मात्र केवळ हिंदूच होता. हिंदुस्थानातल्या मुसलमानांनी मतपेटी द्वारे काँग्रेसला एकच प्रश्न विचारला होता, हम आपके है कौन?.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची स्थापना झाली. पण “अपनेवालों” का देश म्हणून वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला मतदान करणारे या ८७% टक्क्यातील किती मुसलमान रावीपार इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्ये गेले? फारच थोडे. बहुसंख्य इथेच राहिले. स्वातंत्र्यानंतरचे खरे आव्हान या मुसलमानांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात एकरूप करणे हेच होते आणि त्याची संपूर्णपणे नैतिक जबाबदारी सत्ताधारी असल्यामुळे काँग्रेसवर होती.
सूर्य उगवता प्रभात होता तेज पसरता
ना तारा नच चांद
वीरा घे धनुबाण, वीरा घे धनुबाण!!

१४ ऑगस्ट १९४७ पर्यंत इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला जाण्यासाठी ज्यांची शेवटची ट्रेन चुकली किंवा हिंदू बहुल असला तरी “धर्मनिरपेक्ष भारता”त राहून कालांतराने आपल्याला हा देश “दारुल इस्लाम” बनवता येईल या जिहादी मानसिकतेने ज्यांनी जाणून-बुजून आपली ट्रेन चुकवली अशा सर्व मुसलमानांना सत्ताधारी काँग्रेसने तुम्ही स्वेच्छेने मागे राहिला आहात त्यामुळे, आता हा देश तुमची मातृभूमी आहे. त्यामुळे आता इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानशी तुमचा कोणताही संबंध नाही. इथली संस्कृती, इथल्या परंपरा, इथले राष्ट्रीय महापुरुष, तसेच इथले राष्ट्रीय सण तुम्हाला पाळावेच लागतील. असे ठणकावून सांगायला हवे होते. आणि त्यासाठी पुढच्या काळात त्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आखून प्रयत्न करायला हवे होते. न पेक्षा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी भारताच्या सीमा खुल्या आहेत. एखादा प्रश्न सोडवण्याची भारतीय परंपरा साम दाम दंड भेद अशी आहे. ती वापरायला आम्हाला भाग पाडू नका असा गर्भित जमालगोटा चाटवायला हवा होता.
आणि मुसलमान राजसत्तेविरुद्ध डोळा वर काढत नाही ही इतिहासाची साक्षा आहे.

भारतात विलीन व्हायला तयार नसलेल्या हैदराबाद संस्थानावर पोलीस ऍक्शन घेऊन रझाकारांची कंबर तोडल्या बरोबर हैदराबादचा निजाम केंद्रीय गृहमंत्र्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांना हात जोडून शरण आला होता. आणि निमूटपणे खालच्या मानेने त्याने आपल्या हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून टाकले.

क्रूर धर्मांध आणि जिहादी मानसिकतेच्या मुस्लिम आक्रमकांनी सोमनाथ मंदिरावर बांधलेली मशीद केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकऱ्या करून उडवण्यात आली. त्या ठिकाणी मंदिर उभे राहिले. भारताच्या संग्रहालयातील सोमनाथ मंदिराचे मूळ दरवाजे परत त्या ठिकाणी बसवण्यात आले आणि त्या मंदिराच्या उद्घाटनाला भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सोमनाथाची साग्रसंगीत पूजा करून मंदिराचा जिर्णोद्धार पार पडला. पण या देशातील मुसलमानाने राजसत्तेच्या समोर डोळा वर केला नाही.
हा अनुभव गाठीशी असलेल्या काँग्रेसचे म्हणणे मागे राहिलेल्या बऱ्याच मुसलमानांनी निमुटपणे का होईना पण नक्की ऐकले असते. “अल्पसंख्यांक” ही संकल्पनाच अस्तित्वात आणली नसती तर त्यांचे वेगळेपण जपण्याचे काहीच कारण नव्हते.

अल्पसंख्यांक न म्हणता ही मुसलमानांना आपल्या धार्मिक श्रद्धा जपता आल्या असत्या कारण, धार्मिक श्रद्धा आणि उपासना पंथांच्या बाबतीत हिंदू समाजा एवढा उदार व सहिष्णु समाज जगाच्या पाठीवर आढळणार नाही. या विधानाला आपल्या देशातील खऱ्या अर्थाने अल्पसंख्यांक असलेले दोनच विधर्मी समुदाय साक्ष देऊ शकतात. आपापल्या देशात होणाऱ्या धार्मिक छळाला कंटाळून आपला धर्म वाचवण्यासाठी हिंदुस्थानच्या भूमीत शरण घेतलेले ज्यू (यहुदी) आणि पारशी शेकडो वर्षे दुधात साखर मिसळावी तसे हे. लोकसंख्येने काही हजारात असलेले दोन्ही समाज आपल्या धार्मिक श्रद्धा जोपासत हिंदू समाजाबरोबर गुण्यागोविंदाने नांदत आहेत. मग कोटीच्या घरात लोकसंख्या असलेल्या मुसलमानांना कुठे अडचण होती?
खरं तर भारतातला मुसलमान समाज ज्यू आणि पारशी समाजासारखा कुठूनही बाहेरून आलेला नाही. क्रूर अत्याचारी धर्मांध आणि जिहादी मानसिकतेच्या आक्रमक मुस्लिम शासकांनी इथल्याच हिंदूंना बाटवलेले भारतीय मुसलमान आहेत. आपल्या सगळ्यांचा DNA एकच आहे. इतिहासातील काही अपरिहार्य कारणांमुळे तुमचा उपासना पंथ बदलला असला तरी, आपल्या सगळ्यांचे पूर्वज एकच आहेत. आपल्या परंपरा एकच आहेत. यापुढे द्विराष्ट्र सिद्धांत विसरून जायचा. भारत हे एक राष्ट्र आहे. भारत माता हीच तुमची मातृभूमी आहे. तिरंगा तुमचा राष्ट्रध्वज आहे. भारताचे संविधान सर्वोपरी आहे. राष्ट्रगीताचा आणि वंदे मातरमचा सन्मान तुम्हाला करावाच लागेल. असा गोड शब्दात सज्जड दम सत्ताधारी काँग्रेसने भारतीय मुसलमानांना भरला असता. शालेय अभ्यासक्रमात सुयोग्य बदल करून या देशाच्या उज्वल परंपरेचा, इथल्या राष्ट्रपुरुषांच्या क्षात्रतेजाचा इतिहास शिकवला गेला असता तर, त्याचे सुपरिणाम किमान मुसलमानांच्या पुढच्या पिढ्यांपासून दिसू लागले असते.
कायदे आजम बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांच्या “द्विराष्ट्र सिद्धांता”ला शेवटपर्यंत प्राणपणाने विरोध करणाऱ्या खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी, बॅरिस्टर मोहम्मद करीम छागला, रफी अहमद किडवाई, साथी हमीद दलवाई यांच्यासारख्या सच्च्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांना पाठबळ मिळाले असते. मुस्लिम सत्यशोधक समाजासारख्या चळवळींनी चांगल्या प्रमाणात मुस्लिम समाजात मूळ धरले असते. पुढच्या काळात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या राष्ट्रवादी विचारांच्या अनेक मुसलमानांची मांदियाळी उभी राहिली असती आणि आज या शान ए हिंद निहाल अहमद सारखी जिहादी वाळवी आटोक्यात राहिली असती. आणि हे सगळं राबवण्यासाठी काँग्रेसकडे अगदी पुरेसा वेळ होता. पंडित जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्यानंतर सुमारे १७ वर्षे पंतप्रधान होते. पावणे दोन वर्षे लाल बहादूर शास्त्री, १६ वर्षे इंदिरा गांधी, ५ वर्षे राजीव गांधी, ५ वर्षे नरसिंहराव व १० वर्षे डॉक्टर मनमोहन सिंह हे काँग्रेसचे नेते देशाचे पंतप्रधान होते. म्हणजे ५ दशकांहून अधिक काळ हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेसकडे होता. कदाचित भ्रष्टाचारातून त्यांना हा विचार करायला वेळच मिळाला नसावा.
संस्कृती सबकी एक चिरंतन, खून रगों में हिंदू है.

१९५२ साली भारत भूषण (बैजू) आणि मीनाकुमारी (गौरी) यांचा एक हिंदी चित्रपट आला होता. “बैजू बावरा”. यात एक अतिशय सुंदर गाणे होते. आपण सगळ्यांनी ते नक्की ऐकले असेल.
“मन तड़पत हरि दर्शन को आज”
हरीच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेला तो बैजू पुढे आर्ततेने म्हणतो
“बिन गुरू ज्ञान कहाँ से पाऊँ”
तर आणखी पुढच्या कडव्यात काकुळतीने आर्जव करतो
“मुरली मनोहर आस न तोड़ो”
भगवान श्रीकृष्णांना आर्ततेने अळवणाऱ्या या गीताचे गीतकार आहेत शकील बदायुनी या देशातील हिंदू आणि मुसलमानांचा डीएनए एकच असल्याशिवाय शकील बदायुनी यांना हे शब्द सुचणे निव्वळ अशक्य होते. अन्यथा इस्लाममध्ये कुठला आलाय हरी, कुठला आलाय मुरली मनोहर आणि कुठली आलीय गुरु शिष्य परंपरा?. या सगळ्या संकल्पनांना या देशाच्या मातीचा, संस्कृतीचा सुगंध आहे. शकील बदायुनींच्या DNA मध्ये हाच सुगंध दरवळत होता. म्हणूनच त्यांना हे गीत सहजतेने सुचले.
या गीताला संगीत दिले आहे नौशाद (अली) यांनी तर, तो सुमधुर आवाज आहे मोहम्मद रफी यांचा म्हणजे, या गीतातील प्रत्येक कलाकार मुसलमान आहे. शिवाय चित्रपटाची पटकथा लिहिली होती जिया सरहदी यांनी. तर, चित्रपटाची नायिका होती मीना कुमारी (महजबीं बानो). आपली चिरंतन संस्कृती, आपल्या परंपरा, आपला डीएनए एकच असल्याशिवाय इतक्या मुसलमान कलाकारांना घेऊन बैजू बावरा बनवणे सर्वथैव अशक्य होते.
स्वातंत्र्यानंतर केवळ ५ वर्षात या देशातला मुसलमान “संस्कृती सबकी एक चिरंतन खून रगों मे हिंदू है” हे मानायला तयार होत होता. त्याला सत्ताधारी काँग्रेसने थोडे पाठबळ दिले असते तर असे अनेक शकील बदायुनी मुस्लिम समाजात उभे राहिले असते. समाज मन तयार करण्यासाठी चित्रपट हे किती प्रभावी साधन आहे हे सध्या आपण “धुरंदर” या चित्रपटावरून अनुभवत आहोत.
पण पापी काँग्रेसने केले काय?

बहुसंख्य हिंदू मतदार काँग्रेसला मतदान करत असताना देखील मुसलमानांच्या “एकगठ्ठा” मतदानासाठी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने अपरिमित मुस्लिम लांगुलचालन केले. मुल्ला मौलवी इमामांच्या मेंदी लावून लाल झालेल्या दाढ्या कुरवाळल्या. कलम ३७० पासून हज सबसिडी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सबंध रात्रभर संसदेचे संयुक्त अधिवेशन बसवून शहाबानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलण्यापर्यंत लव्ह जिहाद असो किंवा “बोट ठेवीन तिथे मालमत्ता” अशी “वक्फ बोर्डा”ला खुली छूट देण्यापर्यंतचा. लँड जिहाद मुसलमानांच्या धार्मिक आक्रमकतेला काँग्रेसने नेहमीच पाठीशी घातले, नव्हे त्याला खतपाणी देखील घातले.
काँग्रेसने मुस्लिमांचे किती पराकोटीचे लांगुलचालन केले आहे याची खातरजमा करायची असेल तर जिज्ञासूंनी २०१३ साली पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी येऊ घातलेले कोणत्याही पुराव्याशिवाय हिंदू समाजाला गुन्हेगार ठरवून जबरदस्त शिक्षा देण्याची तरतूद असलेले The Prevention of Communal and Targeted Violence (Access to Justice and Reparations) Bill, 2013 जरूर पहावे. ज्या २००५ च्या बिलाची ही सुधारित आवृती होती ते २००५ चे बिल येथे देत आहोत.
याच पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी, “देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क अल्पसंख्यांकांचा (आणि काँग्रेसच्या व्याख्येत अल्पसंख्यांक म्हणजे फक्त आणि फक्त मुसलमान) आहे”. म्हणून जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. काँग्रेसच्या मुस्लिम लांगुलचालनाच्या पापांची यादी न संपणारी आहे.

त्याचवेळी जो बहुसंख्य हिंदू समाज काँग्रेसला मतदान करत होता त्याचा काँग्रेसने कायम विश्वासघात, तेजोभंगच केला आहे. काँग्रेसने स्वीकारलेले आमच्या देशाचे धर्माच्या आधारावरचे विभाजन ही सुरुवात होती. पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू तर स्वतःला “Accidental Hindu” म्हणत. मग तो स्वातंत्र्यानंतर देशात झालेला मुस्लिम बहुल वस्त्यांमधील हिंदू नरसंहार असो. शासकीय पातळीवर इफ्तार पार्ट्या असोत. दर्ग्यांवर पाठवण्यात येणारी चादर असो किंवा राम जन्मभूमी वरील प्रभू श्रीरामांचे मंदिर बांधण्याचा विषय असो अथवा राम सेतू तोडण्याचा विषय असो. (काँग्रेस सरकारने सर्वोच्च न्यायालयात “राम” हे काल्पनिक पात्र असल्याचे शपथपत्र सादर केले होते). काँग्रेसने कायमच हिंदू श्रद्धांची टवाळी केली. हिंदू समाजाला गृहीत धरले आणि त्याची पार अवहेलना केली. काँग्रेसच्या लेखी “हिंदू”ची किंमत पायातल्या व्हाणे एवढी देखील नाही. काँग्रेसने या देशातील सकल हिंदू समाजाची स्थिती “मन तड़पत” अशी करून ठेवली.
स्वातंत्र्यानंतर हातात आलेल्या सत्तेच्या संधीचे सोने करून भारतीय मुसलमानांमध्ये असलेली द्विराष्ट्रवादाची संकल्पना मातीमोल करून त्यांना या देशाच्या संस्कृतीशी एकरूप करण्याच्या सुवर्णसंधीची काँग्रेसने आपल्या हातांनी अक्षरशः माती करून टाकली.
तू नहीं तो कोई और सही,
कोई और नहीं तो कोई और सही…

काँग्रेसच्या दगाबाजीला कंटाळलेल्या आणि हळूहळू जागृत होत असलेल्या सकल हिंदू समाजाला २०१४ साली देशाच्या राजकारणात आपला सूर गवसला. देशाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्रतिष्ठा देणारे “हिंदू” जीवन मूल्यांना आदराने वागवणारे आणि महत्त्वाचे म्हणजे “मुस्लिम लांगुलचालन” हे शब्दच ज्यांच्या शब्दकोशात नाहीत असे सत्ताधारी त्याला सापडले. नव्हे त्याने ते शोधून काढले. देशाला पडलेला काँग्रेसचा हिरवा विळखा त्याने पार भिरकवून दिला.

जागृत सकल हिंदू समाजाच्या संघटित शक्तीपुढे काँग्रेस हतबल झाली. स्वतःला Accidental Hindu म्हणवणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पणतू. आपण दत्तात्रय गोत्री ब्राह्मण आहोत असे सांगून भाड्याने आणलेले धोतर नेसून मंदिरात जाऊन पूजा करू लागला. पण त्याच्या या भूलथापांना हिंदू समाज कसाच बळी पडला नाही कारण, काँग्रेसचा मुस्लिम लांगुलचालनाचा इतका प्रदीर्घ अनुभव त्याच्या गाठीशी आहे की.
तू नहीं तो कोई और सही,
कोई और नहीं तो कोई और सही…
पण तू नको… इतका हिंदू समाज काँग्रेसला विटलेला आहे.
आज नियतीने काँग्रेसवर सूड उगवला आहे. सत्तेसाठी अगतिक झालेल्या काँग्रेसचा “मन तड़पत सत्ता दर्शन को आज” म्हणून विलाप सुरू आहे.
शान ए हिंद निहाल अहमद ही पापी काँग्रेसने पोसलेली वाळवी आहे. आटोक्यात राहिली नाही तर त्या वाळवीवर औषधी फवारणी करणारे सत्ताधारी आज खुर्चीत बसलेले आहेत. हे कोणीही विसरू नये.