Thursday, January 23, 2025

दावोस फोरममध्ये इतिहास घडला! ५४ सामंजस्य करार, १५.७० लाख कोटींची गुंतवणूक, १५.९५ लाख रोजगार निर्मिती!

Share

दावोस : दावोस (Davos) येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) महाराष्ट्राने ऐतिहासिक कामगिरी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या दिवसापर्यंत एकूण १५.७० लाख कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारांमुळे १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

दुसऱ्या दिवशी झालेल्या सामंजस्य करारांमध्ये सर्वांत मोठा करार रिलायन्स समूहाचा असून, त्यांनी पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्र विकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, हॉटेल व्यवसाय आणि रिअल इस्टेट या विविध क्षेत्रांत ३,०५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या करारातून तब्बल ३ लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचा अंदाज आहे.

रिलायन्स समूहासोबत (Reliance Industries Ltd.) ३ लाख ५ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलेला असून, यामधील बहुसंख्य गुंतवणूक सेवा क्षेत्रात होणार आहे, ज्यामुळे अंदाजे ३ लाख रोजगार निर्मिती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवभारताच्या निर्मितीला योगदान देणारा हा करार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे, हे स्वप्न आहे. त्यादृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत, असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी सांगितले.

दुसरी मोठी गुंतवणूक अ‍ॅमेझॉनने (Amazon) केली असून, ती ७१,७९५ कोटी रुपये इतकी आहे. या गुंतवणुकीमधून, मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) डेटा सेंटर्सच्या माध्यमातून ८३,१०० रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून, समतोल विकास साधण्याचा उद्देश यामध्ये आहे. उद्योग विभागाने ११.७१ कोटी रुपयांचे, एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी रुपयांचे आणि सिडकोने ५५,२०० कोटी रुपयांचे करार केले आहेत.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे :

२१ & २२ जानेवारी २०२५ झालेले सामंजस्य करार

MOU स्वाक्षरी : ५४

एकूण गुंतवणूक : 5 लाख 70 हजार कोटी

1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : ५२०० कोटी
रोजगार : ४०००
कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : १६,५०० कोटी
रोजगार : २४५०
कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : १७,००० कोटी
रोजगार : ३२००

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : १२,००० कोटी
रोजगार : ३५००
कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : ७५० कोटी
रोजगार : ३५
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : ३,००,००० कोटी
रोजगार : १०,०००
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : ३०,००० कोटी
रोजगार : ७५००
कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : १००० कोटी
रोजगार : ३००
कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : २००० कोटी
रोजगार : ५०००
कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : २५,००० कोटी
रोजगार : १०००
कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : २५,००० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : एमएमआर

12) व्हीआयटी सेमिकॉन
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : २४,४३७ कोटी
रोजगार : ३३,६००
कोणत्या भागात : रत्नागिरी

13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : ४००० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : १०,५२१ कोटी
रोजगार : ५०००
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

15) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : २५० कोटी
रोजगार : ६००
कोणत्या भागात : एमएमआर

16) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १०,७५० कोटी
रोजगार : १८५०
कोणत्या भागात : पुणे

17) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : १७,५०० कोटी
रोजगार : २३,०००

18) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : ३५०० कोटी
रोजगार : ४०००
कोणत्या भागात : पुणे

19) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : ८००० कोटी
रोजगार : २०००

20) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : १७०० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : एमएमआर

21) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : ८५०० कोटी
रोजगार : १७,३००

22) टाटा समूह
क्षेत्र : अनेक
गुंतवणूक : ३०,००० कोटी

23) सीएट
क्षेत्र : ऑटोमोटिव्ह आणि ईव्ही
गुंतवणूक : ५०० कोटी
रोजगार : ५००

24) ग्रामीण संवर्धक
क्षेत्र : रूग्णालयांसारख्या सामाजिक क्षेत्रातील प्रकल्पांसाठी
गुंतवणूक : १०,००० कोटी

25) पॉवरिन उर्जा
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १५,२९९ कोटी
रोजगार : ४०००

26) ओपन ओरिजिन इंडिया इंक
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १५,००० कोटी
रोजगार : १०००

27) युनायटेड फॉस्फरस लि
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : ६,५०० कोटी
रोजगार : १३००

28) एरुलर्निंग सोल्युशन्स
क्षेत्र : शिक्षण
गुंतवणूक : २०,००० कोटी
रोजगार : २०,०००

29) ऑलेक्ट्रा ईव्ही
क्षेत्र : ऑटोमोटिव्ह आणि ईव्ही
गुंतवणूक : ३००० कोटी
रोजगार : १०००

30) फ्युएल

क्षेत्र : पुण्यात स्किलटेक युनिव्हर्सिटीचा मनोदय

राज्यातील ५००० युवकांना एआय, डिजिटल मार्केंटिंग, बिझनेस अ‍ॅनालिटिक्सचे प्रशिक्षण

31) युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिमिंगहम

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: शाश्वत परिवहन सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

32) रिलायन्स इंडस्ट्रीज लि.

क्षेत्र : पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट

गुंतवणूक: ३,०५,००० कोटी

रोजगार : ३,००,०००

33) वर्धान लिथियम

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स (लिथियम रिफायनरी, लिथियम बॅटरी)

गुंतवणूक : ४२,५३५ कोटी

रोजगार : ५०००

कोणत्या भागात : नागपूर

34) ग्रिटा एनर्जी

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : १०,३१९ कोटी

रोजगार : ३२०००

कोणत्या भागात : चंद्रपूर

35) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ४३,००० कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

36) इंडोरामा

क्षेत्र : वस्त्रोद्योग & टेक्निकल टेक्सटाईल्स

गुंतवणूक : ३१,००० कोटी

रोजगार : ४०००

कोणत्या भागात : रायगड

37) लासर्न अँड टुब्रो लि.

क्षेत्र : संरक्षण उत्पादन

गुंतवणूक : १०,००० कोटी

रोजगार : २५००

कोणत्या भागात : तळेगाव

38) रेनिसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक: ५००० कोटी

रोजगार : १३००

कोणत्या भागात : विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र

39) सिलॉन बिव्हरेज

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : १०३९ कोटी

रोजगार : ४५०

कोणत्या भागात : अहिल्यानगर

40) टॉरल इंडिया

क्षेत्र: अ‍ॅल्युमिनियम आणि मेटल्स

गुंतवणूक : ५०० कोटी

रोजगार : १२००

कोणत्या भागात : अहिल्यानगर

41) नेल्सन मिडिया प्रा. लि.

क्षेत्र : आयटी

गुंतवणूक: ४५० कोटी

रोजगार : ११००

कोणत्या भागात : एमएमआर

42) एमएसएन होल्डिंग्ज लि.

क्षेत्र : सौर

गुंतवणूक : १४,६५२ कोटी

रोजगार : ८७६०

कोणत्या भागात : नागपूर

43) हॅझेरो इंडस्ट्रीज

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : १६,००० कोटी (दोन प्रकल्प)

रोजगार : १०,०००

कोणत्या भागात : बुटीबोरी

44) प्रियम सोल्युशन्स प्रा. लि.

क्षेत्र : ड्रोननिर्मिती

गुंतवणूक : ३०० कोटी

रोजगार : ३००

कोणत्या भागात : जालना

45) हिरानंदानी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ५१,६०० कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

46) सॉटेफिन भारत

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक: ८६४१ कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

47) एव्हरस्टोन समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ८६०० कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

48) इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्हज लि.

क्षेत्र : अंतरिक्ष आणि संरक्षण

गुंतवणूक : १२,७८० कोटी

रोजगार : २३२५

कोणत्या भागात : नागपूर

49) अ‍ॅमेझॉन

क्षेत्र : डेटा सेंटर

गुंतवणूक : ७१,७९५ कोटी

रोजगार : ८३,१००

कोणत्या भागात : एमएमआर

50) गुरुकुल

क्षेत्र : सायबर सुरक्षा

गुंतवणूक : ५०० कोटी

51) टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ४३,००० कोटी

कोणत्या भागात : एमएमआर

52) एमटीसी समूह

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: सर्क्युलर इकॉनॉमी पार्क

कोणत्या भागात : एमएमआर

53) के रहेजा कॉर्प प्रा. लि.

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : ४३,००० कोटी

54) क्रॉसरेल इंटरनॅशनल

क्षेत्र : पायाभूत सुविधा विशेषत: वाहतूक सुविधा

कोणत्या भागात : एमएमआर

……………

दि. 22 जानेवारीपर्यंत

एकूण गुंतवणूक : 15.70 लाख कोटी

एकूण रोजगार : 15.75 लाख

अन्य लेख

संबंधित लेख