Saturday, November 23, 2024

“संजय राऊतांची ‘सिंघम’ खिल्ली, प्रविण दरेकरांचा ‘चिंगम’ पलटवार!”

Share

आगामी विधानसभा निवडणुकाची लगभग सुरु झालीये. निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी दिवाळीनंतर राज्यात निवडणुकांचा मुहूर्त लागेल अशी चर्चा आहे. सत्ताधारी आणि विरोधक, दोघेही निवडणुकीच्या तयारासाठी लागले आहेत. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, एकमेकांन लक्ष्य करण्याची एकहीसंधी सोडत नाहीत. सामनाच्या अग्रलेखातून आजा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधण्यात आला. सिंघम मुख्यमंत्री अशी त्यांची खिल्ली उडवत फडणवीसांवर टीका करण्यात आली. मात्र हे सत्ताधारी भाजप नेत्यांना फारसे रुचले नसून आता भाजप नेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चिंगम‘ संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये, अशा शब्दांत प्रविण दरेकरांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

‘एक्स’ वर प्रविण दरेकर यांनी एक ट्विट करत राऊत यांना चांगलंच सुनावलं आहे. “महाराष्ट्रातील स्वयंघोषित चघळून चोथा झालेल्या ‘चिंगम‘ संजय राऊत यांनी ‘सिंघम‘ देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये. देवेंद्रजींबद्दल अग्रलेख लिहून टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे, पण ही थुंकी संजय राऊत यांच्याच तोंडावर पडली आहे,” असे दरेकर म्हणाले आहेत. ज्यांनी आयुष्यभर ‘चमचेगिरी‘ केली त्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार? धर्मवीरची पटकथा लिहिणं आणि सामनाच्या अग्रलेखातून ‘चमचेगिरी‘ करणं यात फरक असतो.

“देवेंद्र फडणवीस जी हे आधुनिक अभिमन्यू आहेत. तुमच्यासारख्या कितीही कपटी ‘शकुनीं‘नी त्यांना घेरलं तरी तुमचं ‘चक्रव्यूह‘ भेदण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यामुळे तुम्ही देवेंद्रजींच्या चित्रपटाची काळजी करू नका. देवेंद्रजी फडणवीस जी पटकथा लिहितील तो चित्रपट सुपरहिट होईलंच. पण त्यापूर्वी पत्राचाळीत मराठी माणसांची घरं तुम्ही हडप केली. त्यावर ‘पत्राचाळीचा लुटारू राऊत‘ या चित्रपटाची पटकथा कशी वाटेल? याचा विचार करा. मराठी माणसाला रस्त्यावर आणण्यासाठी त्यात तुम्ही जी खलनायकाची भूमिका वठवली. ती महाराष्ट्रातील जनता विसरली नाही'” असे ते म्हणाले.

‘देवेंद्रजी फडणवीस हे इन्फ्रामॅन आणि महाराष्ट्राचे नायक आहेत. त्यासाठी संजय राऊत तुमच्यासारख्या ‘नालायका‘च्या सर्टिफिकेटची गरज नाही’ असे म्हणत प्रविण दरेकर यांनी संजय राऊत यांना फटकारलं आहे.

अन्य लेख

संबंधित लेख