Saturday, September 7, 2024

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस

Share

नागपूर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवले आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारला असता त्यांनी “कोण संजय राऊत? तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकासंदर्भात प्रश्न विचारत जा, प्रश्न विचारताना माझा स्तर तरी पहा, म्हणत त्यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली.

काय आहे प्रकरण

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. ‘श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या भव्य उपक्रमावर आतापर्यंत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचे स्रोत काय? या कार्यासाठी ज्यांनी कोट्यवधी रुपये दिले ते दानशूर कोण? याची माहिती नागरिकांना मिळणे गरजेचे आहे.’ असे अनेक आरोप त्यांनी पत्रात केले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख