Tuesday, December 16, 2025

धायरीत ‘राजदंडधारी’ शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भव्य अनावरण

Share

पुणे/धायरी : धायरी गावातील पवळी चौक, काळभैरवनाथ मंदिर परिसर शिवमय झाला होता. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते राजदंडधारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भव्य जल्लोषात पार पडले. ढोल-ताशांचा गजर, शिवघोष आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण परिसर भगव्या उत्साहाने भारावून गेला होता.

या अनावरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि आमदार भिमराव तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचा वारसा, शौर्य आणि आदर्श मूल्यांवर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

‘शिवशंभो गर्जना’ने परिसर भारावला
या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले सुप्रसिद्ध गायक अभिजीत जाधव व आमु जाधव यांचा ‘शिवशंभो गर्जना’ हा शिवभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम. त्यांच्या दमदार सादरीकरणाने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि संपूर्ण परिसर शिवरायांच्या जयघोषात न्हाऊन निघाला.

पुतळ्याच्या स्थापनेमुळे धायरी परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होईल, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. माजी नगरसेविका अश्विनी पोकळे, पै. किशोर पोकळे व धायरी ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अन्य लेख

संबंधित लेख