Friday, January 3, 2025

कुत्र्याचे मांस मटण म्हणून विकण्याचा प्रकार बेंगरुळु मध्ये उघडकीस

Share

बेंगळुरू: शहरातील मॅजेस्टिक परिसरात कुत्र्याचे मांस (Dog Meat) बेकायदेशीरपणे आणून विकले जात असल्याच्या आरोपानंतर बंगळुरूमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. जयपूर, राजस्थान येथून दररोज सहा टन कुत्र्याचे मांस कर्नाटक राज्यात आणले जाते असा आरोप केला गेला आहे.

सदर घटना एका सामाजिक कार्यकर्त्याने काही महिन्यांपूर्वी बेगरुळु महापालिका, स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाला कळविली होती मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

शुक्रवार २६ जुलै रोजी क्रांतिवीर संगोळी बेंगरुळु शहर रेल्वे स्थानकात राजस्थानमधून कुत्र्याचे मांस रेल्वेने कर्नाटकात आणले जात असल्याचा दावा करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पुनीत करेहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानकावर निदर्शने केली. काही मांसाच्या पेट्यांची तपासणी करताना कार्यकर्त्यांची आणि मांस व्यापाऱ्यांची झटापट झाली. यावेळी तेथे उपस्थित स्थानिक मुस्लिम नेता आणि मटण व्यापारी अब्दुल रझाक याने मांस पेट्या उघडण्यास नकार दिला होता. त्या पेट्यांमध्ये मटणाऐवजी कुत्र्याचे मांस असल्याचा दावा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला. पेट्यांमधील मांसाला कुत्र्यासारखी लांब शेपटी असल्याचे आढळून आल्यावर परिस्थिती आणखीनच चिघळली.

पुनीत करेहळ्ळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राजस्थानमधून दररोज सहा टन मांस येते. ते मांस नंतर कुत्र्याच्या मांसात मिसळले जाते आणि रसेल मार्केट परिसरात विकले जाते.

पोलिसांनी मांसाच्या ९० पेट्या ताब्यात घेतल्या आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकारी मांस वाहतुकीचा स्रोत तपासत आहेत आणि पाठवणाऱ्याकडे आवश्यक परवानग्या होत्या का याचाही तपास करीत आहेत . मांस कोणत्या प्राण्याचे आहे ते शोधण्यासाठी मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्ता पुनीत करेहळ्ळी यांना आंदोलन प्रकरणी अटक केली आहे.

प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अन्वये कुत्र्यांना विनाकारण त्रास देणे, त्यांना मारणे आणि त्यांचे मांस सेवन करणे प्रतिबंधित आहे.

अन्य लेख

संबंधित लेख