पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर (Diwali gift) लक्ष ठेवणार असल्याचा निवडणूक आयोगाचा(Election commission of India) इशारा
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या काळात राजकीय पक्ष किंवा उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंवर निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असणार आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी C-VIGIL ऍपवर नोंदवू शकतात, अशी माहिती अतिरीक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.
https://x.com/MahaDGIPR/status/1846555966738723179
आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात जर काही शासन आदेश जारी झाले असतील किंवा जाहिराती प्रसिद्ध झाल्या असतील तर त्याचीही चौकशी केली जाईल,असं कुलकर्णी यांनी संगीतलं.निवडणुकीत उमेदवाराला कमाल 40 लाख रुपये खर्च करता येणार आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खर्चाची मोजणी सुरू होईल पण अर्ज भरण्यापूर्वी खरेदी केलेल्या प्रचारसाहित्याचा खर्च यात धरला जाईल,अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी दिली.