Thursday, October 10, 2024

अनिल देशमुख यांनी गिरीश महाजनांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला

Share

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यात वाक्ययुद्ध सुरु आहे, ते काही थांबायचं नाव घेत नाही. यातच अनिल देशमुख यांनी फडणवीसांना मला सांगायचंय की माझ्या अटकेची वाट पाहत आहे असं म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून त्याच्यावर दबाव टाकत माझ्यावर खोटे आरोप करत म्हटलं होतं. यावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिल आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, अनिल देशमुख केवळ सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. राज्यात आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हे प्रकरण सीबीआयला दिले होते. या केसमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की, एसपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याने बयान दिला आहे की, अनिल देशमुख यांनी माझ्यावर दबाव टाकलाय, की गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना आरोपी करा. त्यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, किंबहुना त्यांना जीवनातून उठवण्याचा देखील प्रयत्न त्यात करण्यात आला. यासंबंधीचे सर्व पुरावे एसपींनी सीबीआय कडे दिलेले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या संदर्भातल्या अनेक नोंदी वरिष्ठांना कळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीबीआयच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. असे असताना त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की, कुठलीही चूक नसताना गिरीश महाजन यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी सर्वप्रथम माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांची माफी मागितली पाहिजे. अशी मागणीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख