उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्तीथीत झाला ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा प्रीमियर सोहळा. हा चित्रपट आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असून त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीला समर्पित आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी मुंबईतील एका प्रसिद्ध मल्टिप्लेक्समध्ये मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले.
या सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्ही दाखवणार आहोत की काही जणांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा त्याग करून सत्तेसाठी काँग्रेस-एनसीपीशी आघाडी केली.” हे चित्रपटातून स्पष्ट होणार आहे की, शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सेक्युलर विचारांपेक्षा दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची बाजू घेतली.
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, निर्माते मंगेश देसाई म्हणाले होते, “धर्मवीर १ मध्ये अनेक कारणांनी समाविष्ट करता आले नाहीत आणि त्यामुळेच हा भाग बनवला जात आहे.”
‘धर्मवीर २’ हा चित्रपट आता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी खुले झालेले आहे, आणि त्याच्या विषयांमुळे, राजकीय संदर्भांमुळे हा चित्रपट पाहण्यासाठी सर्वच वयोगटांतील प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.