उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता समाज भवन, नंदगिरी रोड, पाचपावली, मध्य नागपूर येथे हलबा समाजातील युवक व युवतींसाठी ‘व्यावसायिकरण व स्वयंरोजगार’ या विषयावर जेष्ठ विचारवंत व पत्रकार याच सोबत झी 24 तास या वाहिनेचे माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर मार्गदर्शन करणार आहेत. हलबा समाज हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा समाज मानला जातो, येणाऱ्या काळात हलबा समाजातून अनेक उद्योजक घडावेत जे संपूर्ण देशात आपले व समाजाचे नाव मोठे करतील याच दृष्टिकोनातून या विशेष व्याख्यानाचे आयोजान करण्यात आले आहे.
माजी नगरसेवक श्री. भास्कर पराते यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. डॉ. उदय निरगुडकर हे भारतातील प्रसिद्ध नावांपैकी एक नाव आहे. निरगुडकरांनी आपल्या वाणीतून देशात व महाराष्ट्रात शेकडो सकारात्मक बदल घडवून आणले आहेत, त्यांचा यशाचा मार्ग हलबा समाजातील युवक-युवतींना कळाला तर हलबा समाजातील अनेक युवक-युवती आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील व त्यांचे व्यवसाय जगप्रसिद्ध होतील याच स्वप्नवत इच्छेने आयोजकांनी या व्याख्यानाचे आयोजन केले आहे, त्यामुळे नागपूर शहरातील संपूर्ण हलबा समाजाने या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी इच्छा आयोजकांनी मध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.