Sunday, April 13, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Share

महाराष्ट्र : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, तसेच महानगरपालिका निवडणुकांच्या वेळापत्रकासंदर्भातील निर्णय या सुनावणीत होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. यामध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असून, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. याआधी २२ जानेवारीला सुनावणी होणार होती, मात्र ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख