पुणे : पुण्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे काही भागात पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुण्यात (Pune) कालच प्रशासनाने रेड अलर्ट दिला होता. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.
खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
- “तुम्ही भारताच्या लेकी, देश तुमच्या पाठीशी”; विश्वविजेत्या ‘दृष्टीबाधित’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव!
- प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- INDvSA : हार्दिक-तिलकचं वादळ अन् वरुणचा कहर; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ‘महाविजय’, मालिका ३-१ ने खिशात!
- राज्यातील उर्वरित २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान; रविवारी सर्व २८८ ठिकाणांचे निकाल
- पुस्तक परिचय: Leadership: Six Studies in World Strategy