Saturday, October 12, 2024

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी

Share

पुणे : पावसाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी (Schools and Colleges) जाहीर करण्यात आली आहे. असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्य़ात काल दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी झाडपडी च्या घटना घडल्या, तर काही घरामध्ये पाणी जाण्याच्या घटना देखील घडल्या. शहरातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली.

भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कळकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख