Saturday, October 12, 2024

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Share

महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचं
लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी;
कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसंच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ
पुण्यातून या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही रेल्वे हुबळीसाठी रवाना
होईल. पुणे-हुबळी आणि कोल्हापूर-पुणे या दोन्ही गाड्या प्रत्येकी तीन दिवस धावणार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख