इटलीत पार पडलेल्या जागतिक स्केट स्पर्धा २०२४ मध्ये भारतीय महिला रोलर डर्बी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे . पुण्याच्या श्रुतिका सरोदेच्या नेतृत्वाखालील या संघाने चीनवर 127-39 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला आणि कांस्य पदका जिंकले. हे भारतासाठी रोलर डर्बीमध्ये पहिलेच पदक आहे.
या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पसरले आहे. श्रुतिका सरोदे आणि तिच्या संघातील सर्व सदस्यांना खेळाडू म्हणून आणि देशासाठी केलेल्या या उत्तम कामगिरीबद्दल अनेक शुभेच्छा आल्या आहेत.
या मध्ये विशेष आणि महाराष्ट्रा साठी गर्वाची बाब म्हणजे या भारतीय महिला संघा मध्ये पुण्यातील दोन सख्या बहिणी वैदेही सरोदे आणि श्रुतिका सरोदे यांचा समावेश होता आणि विशेष कौतुकाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्रुतिका सरोदे हि भारतीय महिला संघाची कर्णधार होती.
या संघाची ही कामगिरी आजवरच्या सर्वांत चांगल्या प्रदर्शनांपैकी एक आहे आणि हे पदक भारताच्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. भारतीय रोलर डर्बी संघाने देशाला आणखी अनेक पदके जिंकून देण्याचा विश्वास निर्माण केला आहे .