मुंबई : आगामी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 साठी बीसीसीआयने (BCCI) १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही मेगा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, निवड समितीने संघात मोठे फेरबदल केले आहेत.
मोठे बदल: इशान किशनचे पुनरागमन, शुभमन गिल बाहेर!
या निवडीत सर्वात मोठा धक्का म्हणजे सलामीवीर शुभमन गिल याला संघातून वगळण्यात आले आहे. खराब फॉर्ममुळे त्याला स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे, झारखंडला ‘सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी’ जिंकून देणाऱ्या इशान किशनने संघात दिमाखात पुनरागमन केले आहे. तसेच, अक्षर पटेलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडिया:
फलंदाज: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
यष्टीरक्षक: इशान किशन, संजू सॅमसन.
अष्टपैलू: अक्षर पटेल (उपकर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे.
फिरकीपटू: वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
टीम इंडियाच्या या संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असून, 2026 च्या टी-20 विश्वचषकात भारत पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
टीम इंडियाचे वेळापत्रक (Group A):
भारताचा समावेश ‘ग्रुप A’ मध्ये असून पाकिस्तानविरुद्धचा हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारीला होणार आहे.
७ फेब्रुवारी: विरुद्ध अमेरिका
१२ फेब्रुवारी: विरुद्ध नामिबिया
१५ फेब्रुवारी: विरुद्ध पाकिस्तान
१८ फेब्रुवारी: विरुद्ध नेदरलँड्स
टी-20 विश्वचषक 2026 : 20 संघ, 4 गटांत विभागणी
टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून, त्यांना चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक गटात पाच संघांचा समावेश आहे.
गट अ (Group A):
भारत, पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स, नामिबिया
गट ब (Group B):
ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड, झिम्बाब्वे, ओमान
गट क (Group C):
इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली
गट ड (Group D):
न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई
या गटांमधून साखळी सामने पार पडल्यानंतर पुढील फेरीसाठी संघ पात्र ठरणार असून, चाहत्यांना अनेक रोमांचक लढती पाहायला मिळणार आहेत.
स्पर्धेचे स्वरूप
एकूण २० संघ ४ गटात विभागले गेले आहेत. स्पर्धेचा उद्घाटन सामना ७ फेब्रुवारीला पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स असा होईल, तर अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आपल्या घरच्या मैदानावर पुन्हा एकदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरेल.