Thursday, October 10, 2024

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५ कोटी रुपयांचा हप्ता

Share

महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाखो लाभार्थ्यांना २७४५कोटी रुपयांचा हप्ता पंतप्रधान नरेंद्र
मोदी झारखंडमधल्या जमशेदपूर इथे १५ सप्टेंबर रोजी वितरित करणार आहेत. केंद्रीय ग्रामीण विकास
मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल ही माहिती दिली. यासोबतच सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांना स्वीकृती
पत्रांचं वाटपही यावेळी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात लोक मोठ्या
संख्येने सहभागी होणार असून लाखो लोक ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत. चौहान यांनी
राज्यांच्या ग्रामीण विकास मंत्र्यांची काल दूरस्थ पद्धतीनं बैठक घेऊन कार्यक्रमाच्या तयारीसाठी
आवश्यक त्या सूचना दिल्या.

अन्य लेख

संबंधित लेख