Tuesday, September 17, 2024

ICC अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड; भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण

Share

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) विद्यमान मानद सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे नवीन अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह, 1 डिसेंबर 2024 रोजी आपले पद स्वीकारतील आणि पुढील 6 वर्षे अध्यक्ष राहू शकतात. जय शाह वयाच्या 35 व्या वर्षी हे प्रतिष्ठित पद भूषवणारे सर्वात तरुण बनले आहेत, जे क्रिकेटच्या प्रशासनासाठी एका नवीन युगाचे संकेत देतात.

20 ऑगस्ट रोजी सध्याचे आयसीसी अध्यक्ष ग्रेग बार्कले तिसरी टर्म अध्यक्ष राहणार नाहीत अशी घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यावर ते पायउतार होतील. आयसीसीने 27 ऑगस्ट ही अध्यक्षपदासाठी नामांकनाची अंतिम तारीख निश्चित केली होती. नियमांनुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक होईल, ज्यामध्ये आयसीसीचे 16 सदस्यीय मंडळ मतदान करेल, चेअरमनपदासाठी एकमेव नामनिर्देशित असलेले जय शाह यांनी क्रिकेटची जागतिक पोहोच आणि लोकप्रियता वाढविण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर जोर दिला, विशेषत 2028 मध्ये ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट चा समावेश.

अन्य लेख

संबंधित लेख