Sunday, September 8, 2024

कंगना राणौतची पोस्ट चर्चेत; राजकारणी राजकारण करणार नाही तर काय पाणीपुरी विकणार का?

Share

मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा तिच्या थेट उत्तरांमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे समर्थन करत ज्योतिर्मठ शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेत्रीने कंगना राणौतने तिच्या एक्स अकाऊंटवर शंकराचार्य स्वामींबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले आहे, “राजकारणात आघाडी, संधी आणि एका पक्षाचे विभाजन होणे ही अतिशय सामान्य आणि घटनात्मक गोष्ट आहे. काँग्रेस पक्षाचे विभाजन १९०७ आणि १९७१ मध्ये झाले होते. जर राजकारणात राजकारणी राजकारण करणार नाही तर काय पाणीपुरी विकणार का?” असा सवाल तिने उपस्थित केला.

“शंकराचार्यांनी त्यांच्या शब्दसंपत्तीचा आणि त्यांच्या प्रभावाचा आणि धार्मिक शिक्षणाचा गैरवापर केला आहे. धर्म देखील असेच सांगतो की जर राजा प्रजेचे शोषण करू लागला तर राजद्रोह हाच शेवटचा धर्म आहे. शंकराचार्य जी, आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यांना अपमानास्पद भाषेत गद्दार, विश्वासघातकी असे आरोप करून आपल्या सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. शंकराचार्य या प्रकारच्या लहान आणि क्षुद्र गोष्टी करून हिंदू धर्माची प्रतिष्ठा कमी करत आहेत.”

अन्य लेख

संबंधित लेख