केज : केज तालुक्यातील वडमाऊली दहिफळ येथे भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangeeta Thombare) या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेला एक कार्यक्रम आटपून केजकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक झाली. या हल्ल्यात चालकाच्या बाजूची काच फुटली आहे. या घटनेत संगीता ठोंबरे व वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की “दगडफेक करणारा हल्लेखोर कोण होता त्याची माहिती मिळाली आहे. तसेच या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे”. केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की “माजी आमदार संगीता ठोंबरे या वडमाऊली दहिफळ येथून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम करून येत असताना गावापासून अर्ध्या किमी अंतरावर ही दगडफेकीची घटना घडली. संगीता ठोंबरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर त्यांच्या वाहनाचा चालक जखमी झाला आहे. मद्यपान केलेल्या एका इसमाने ही दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे”.
बीड जिल्ह्यातील केज विधानसभा (राखीव) मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यावेळी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते त्या सध्या विधानसभा मतदार संघात भेटीगाठी घेत दौरे करत आहेत. संगीता ठोंबरे यांना २०१९ मध्ये भाजपने उमेदवारी दिली नव्हती. त्यांच्या ऐवजी ऐन वेळी पक्षात आलेल्या नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने थांबण्यास सांगितल्यामुळे आपण पाच वर्षे थांबलो. आता आपण सक्रिय झालेलो आहोत, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगत सार्वजनिक कार्यक्रमांमधील सहभाग वाढवला आहे. अलीकडेच त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची देखील भेट घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाकडून तिकीट मिळवण्यासाठी संगीता ठोंबरे प्रयत्नांत आहेत.
- शरद पवारांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला; गोपीचंद पडळकरांची टीका
- हिंगोली : हेमंत पाटील यांना मंत्रिपदाचा दर्जा; एकनाथ शिंदेकडून राजकीय पुनर्वसन
- …असे आहेत हे हिंदुत्वाचे आद्य पुरस्कर्ते..; व्हिडिओ शेअर करत भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- शेतकऱ्यांच्या गळ्याला वृत्तपत्रांचा फास (भाग १)
- आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय प्रकरणी घोष यांना सीबीआय कोठडी