Tuesday, September 17, 2024

पुण्यात होणार 3 नवीन फौजदारी कायद्यांवर कार्यशाळा

Share

शनिवार, दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज येथे वकिल आणि विधी विद्यार्थी यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. लॉयर्स डेव्हलपमेंट फोरम, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज, पुणे बार असोसिएशन, नोबल एडवोकेट्स ट्रस्ट आणि लायन्स क्लब पुणे विधीज्ञ या सर्व संस्थांनी पुढाकार घेऊन या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी या कार्यशाळेची वेळ असणार आहे. भारतीय न्याय संहिता 2023 , भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, भारतीय साक्ष अधिनियम 2023 या तीन नवीन फौजदारी कायद्यांवर या कार्यशाळेत सखोल चर्चा होणार आहे.

या कार्यशाळेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मा. न्यायमूर्ती श्रीमती उर्मिला जोशी-फाळके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचसोबत सन्माननीय अतिथि म्हणून पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे मा. मुख्य न्यायाधीश श्री. महेंद्र महाजन, पुणे कौटुंबिक न्यायालयाच्या मा. मुख्य न्यायाधीश सौ. मनीषा काळे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे उपाध्यक्ष अॅड. डॉ. उदय वारुंजीकर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा च्या  बी.एल.ई.पी कमिटीचे अध्यक्ष अॅड. गजानन चव्हाण आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. संतोष खामकर हे उपस्थित असतील. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व वकील मंडळींनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन सर्व संयोजक संस्थांनी केले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख