Saturday, July 27, 2024

लोकसभा निवडणूक: तिसऱ्या टप्प्याची नामांकन प्रक्रिया उद्यापासून सुरु

Share

‘भारतीय निवडणूक आयोगा’तर्फे (ECI) उद्यापासून ता. १२ एप्रिल २०२४, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ९४ संसदीय मतदारसंघांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील बैतुल येथील मतदान स्थगित करण्यात आले आहे, त्याविषयी स्वतंत्र अधिसूचना काढण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.

आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा व नगर हवेली, दमण व दीव, गोवा, गुजरात, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. येथील उमेदवारी अर्जांची छाननी २० एप्रिल रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल २०२४ आहे.

हा टप्पा १८ व्या लोकसभेच्या २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा एक भाग आहे. सात टप्प्यात होणारी ही लोकसभा निवडणूक १९ एप्रिलपासून सुरू होऊन १ जून २०२४ रोजी संपणार आहेत. निवडणुकांचे निकाल ४ जून २०२४ रोजी घोषित होणार आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख