Friday, October 18, 2024

महाराष्ट्र निवडणुकीसाठी महायुती सज्ज; देवेंद्र फडणवीसांचा “शंखनाद” व्हिडिओ तुफान व्हायरल

Share

महाराष्ट्र : भारताच्या निवडणूक आयोगाने बहुप्रतीक्षित महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ (Maharashtra Assembly Election 2024) चे वेळापत्रक अधिकृतपणे घोषित केले आहे. राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच भाजपचे (BJP) नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोशल मीडियावर “शंखनाद” (Shankhnad) असं शीर्षक देत व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत फडणवीसांनी एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, “लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल ! आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू! भाजपाच्या नेतृत्वात आपण 2014, 2019 ला भरभरून यश दिले, संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या, आणि 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या! या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशिर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय…” अशी मागणी त्यांनी जनतेला यावेळी केली.

अन्य लेख

संबंधित लेख