Sunday, October 13, 2024

अण्णासाहेब पाटील; मराठा आरक्षणाचा पहिला मावळा आणि पहिला बलिदानी

Share

अण्णासाहेब पाटील हे पहिले व्यक्ती होते ज्यांना मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे कळालं होतं,त्यांनी मुंबईत ऐतिहासिक आंदोलन उभं केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं आणि सर्व अनुयायांना शब्द दिला होता की जर उद्या पर्यंत मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्याचा सूर्य पाहणार नाही आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी आत्महत्या केली.

हे सर्व तर तुम्हाला माहित असेलच ? पण कधी विचार केला आहे की जरांगे पाटील हे काही दिवसांचं उपोषण करून मराठ्यांच्या राजकीय भूमिकांचे केंद्रबिंदू ठरले,त्यांनी लोकसभेत अनेक मतदारसंघात मराठा मतांना कसं प्रभावित केलं हे लपून नाही,तर उपोषणाने जरांगे यांची ताकद ऐवढी वाढली पण अण्णासाहेबांनी तर ऐवढं मोठं बलिदान दिलं होतं आणि मूळातच त्यांनीच आरक्षणाचा मुद्दा निर्माण केला तरी त्यांच्या नावाभोवती कधीही राजकारण दशकं फिरलं का नाही. जरांगेंच्या उपोषणाला भावूक होणारा मराठा समाज हा अण्णासाहेबांच्या आत्महत्येनंतर झोपूनच होता त्यांनी कोणतच राजकारण बदललं नाही,अण्णासाहेब यांच्या मराठ्यांसाठी ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांना दुर्लक्षीत करणाऱ्या नेत्यांना मराठ्यांनी कोणताही राजकीय त्रास दिला नाही उलट त्या नेत्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढ्यांची वोटबँक सुद्धा मराठाच आहे.

हा फरक कसा काय ? जरांगेंमध्ये असं काय आहे जे अण्णासाहेबांमध्ये नव्हतं ?त्यांनी आरक्षणाच्या लढ्याला सुरवात केली होती म्हणून अण्णासाहेबांचं नाव आज घ्यायला लागतं,पण मराठ्यांनी कित्येक दशकं अण्णासाहेबांच्या सामाजिक वारश्याला वाळित का टाकलं होतं ?

चला जाणून घेऊ!

तर अण्णासाहेबांची मागणी ही मराठ्यांना आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं ही होती कारण त्यांना माहित होतं की सामाजिक मागास या निकषावर मराठे बसत नाहीत म्हणून त्यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण मागितल्यालं. (थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांची मागणी EWS ची होती)आणि एक गोष्ट लपवली जाते ती म्हणजे त्याचं आंदोलन हे फक्त मराठा आरक्षणासाठी नसून कल्याण,बदलापूर व भिवंडीतील शिवजयंतीवर असलेल्या बंदीला उठवण्यासाठी देखील होतं.कल्याण,बदलापूर आणि भिवंडी सारख्या शहरांमध्ये शिवजयंतीवर बंदी होती आणि ती देखील सरकारी हे ऐकून आश्चर्य झालं असेेल पण होय या शहरांमध्ये 14 वर्ष शिवजयंतीवर बंदी होती.

शिवजयंतीमूळे सामाजिक तणाव निर्माण होते आणि कल्याण,बदलापूर व भिवंडीतील “अल्पसंख्याक” समाजाच्या भावना दुखावतात म्हणून काँग्रेस सरकारने या शहरांमध्ये 1970 साली शिवजयंतीवर बंदी आणली होती.ही देखील त्यांची मागणी होती व ती मागणी मान्य होत नाही म्हणूनच सत्ताधारी आमदार असून देखील त्यांनी स्वताच्या पक्षाचा विरोध केला.आणि या मागणीचा समावेश देखील त्यांनी केलेल्या आंदोलनात होता आणि दुर्देव म्हणजे सरकारने अण्णासाहेबांच्या आत्महत्येनंतरही 2 वर्ष शिवजयंतीवर वरील बंदी उठवली नव्हती.

ऐवढंच काय त्यांनी फक्त मराठा समाजाचा विचार न करता सर्व मराठी समाजाचा विचार करून महाराष्ट्रातील सरकारी नोकऱ्यांमध्ये 80% आरक्षण हे मराठी भाषिकांसाठी असलं पाहिजे ही मागणी देखील आंदोलनात केली होती.पण अर्थातच तेव्हाच्या सरकारला मत देणारा (जो अत्ताही त्यांनाच देतो) तो समाज हा उर्दूला स्वताची बोली मानतो,त्यांची मूले तीच भाषा शिकतात यामूळे सरकारला कुठेतरी भिती होती की जर 80% आरक्षण हे मराठी भाषिकांना दिलं तर उर्दू बोलणारा आपला मतदार आपल्याशी दुरावला जाईल म्हणून त्यांनी अण्णासाहेबांची ही मागणी देखील धूडकावली.

मराठा आरक्षणासाठी पहिली मागणी आणि पहिलं बलिदान देणारा नेता आपला आमदार होता म्हणून महाराष्ट्र काँग्रेसने तर त्यांचे फोटो प्रत्येक पोस्टर वर लाऊन मराठ्यांची मते मिळवली पाहिजेत,सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या चेहऱ्यापेक्षा अण्णासाहेबांचा चेहरा जास्त मते मिळवून देऊ शकतो,
तरी ही काँग्रेसचा हा आमदार काँग्रेससाठी अस्पृश्य का ?

कारण हेच की अण्णासाहेब हे फक्त मराठावादी नव्हते तर अल्पसंख्याकांच्या भावना दुखावतील म्हणून स्वताचे उत्सव साजारा करणे थांबवू नये या हिंदुत्ववादी विचारधारेचे सुद्धा होते आणि जातीय भेद विसरून “मराठी भाषिक” म्हणून सर्वच जातीच्या लोकांसाठी मागण्या करणारे देखील होते.

चला राजकारणी तर राजकारणी पण मराठा समाज देखील अनेक वर्ष अण्णासाहेब पाटलांचं नाव काढायचा नाही,मराठ्यांनी कधी अण्णासाहेबांचा बदला म्हणून कोणाला निवडणूकीत पाडलं नाही,उलट आज जी लोकं त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार होती त्यांच्या मूलाबाळांना व नातवांना निवडूण द्यायला आजही मराठा समाज मैदानात उभा आहे.असं का ? मानो या ना मानो ग्रामीण भागातल्या मराठा समाजाच्या बोटावरचेच मत नव्हे तर मेंदूतले मत देखील आर्थिक सामंत कुटूंब नियंत्रित करतात.महाराष्ट्रात असे असे कायदे बनवले गेल्याले की आमूक तमूक क्षेत्रात एकाच कुटूंबाचे कारखाने,विद्यापीठे व ईतर गोष्टी उभ्या राहतील.व त्यावर मास्टरस्ट्रेक म्हणजे त्या जिल्ह्याला सरकारी सुविधा कमी द्यायच्या म्हणजे द्या क्षेत्रातील लोकं या भ्रमात जगतील की “आपल्या क्षेत्रात काहीच नाही,जे काही आहे ते साहेबांचं आहे,ते नसते तर मूळीच काही नसतं”

विश्वास बसत नसेल तर गूगल वर जाऊन महाराष्ट्रातल्या सरकारी मेडीकल कॉलेजची लिस्ट बघा,त्यात तुम्हाला आढळून येईल की 22 जिल्ह्यांमध्ये एकही सरकारी मेडिकल कॉलेज नाही,पण त्या 22 जिल्ह्यांमधली जी राजकारणी कुटूंब आहेत त्यांच्या किती खाजगी शिक्षण संस्था आहेत हे तपासा आणि विचार करा की हे लोकं खाजगी किंवा सहकारी शिक्षण संस्था उभ्या करू शकतात त्या चालवू शकतात पण चार चार पिढ्या राजकारणात खिशात घालून फिरून देखील त्याच क्षेत्रातल्या सरकारी सुविधा का नाही आणू शकत ?
अनेक मतदारसंघातल्या शेकडो गावांचा रोजगार हा कोणत्यातरी राजकारण्याच्या कारखान्यावर टिकलेला असतो,चांगली गोष्ट आहे रोजगार उपलब्ध करून देतात,म्हणूनच लोकं त्यांच्या चार पिढ्यांना निवडूण देतात आणि म्हणून त्या चार पिढ्या मिळून गावात कधी दूसरे चार रोजगार आणत नाहीत.आणि हेच प्रत्येक क्षेत्रातले आर्थिक सामंत अण्णासाहेबांच्या मृत्यूवेळी सत्तेत होते म्हणून ग्रामीण भागातल्या मराठ्यांसाठी अनेको दशके अण्णासाहेब आणि त्यांचा सामाजिक लढा हा काही किमतीशीर नव्हता.

सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे ग्रामीण भागातल्या मराठ्यांनी अनेको दशके अण्णासाहेबांच्या बलिदानाला दुर्लक्षित केलं कारण त्या बलिदानामूळे कुठेही दोन समाजांमध्ये शर्यतीचं वातावरण निर्माण होत नाही.सर्वच समजांमध्ये जातीय अस्मिता तेव्हाच जास्त फूगून येते जेव्हा दूसऱ्या समाज्या सोबत त्यांची शर्यत आहे हे वातावरण असतं,सध्या आपण जे पाहतो की ब्राह्मण मूळे आरक्षण मिळत नाही,या वंजारी कुटूंबामूळे आरक्षण मिळत नाही,हा माळी नेता आपल्या OBC प्रवेशाला विरोध करतो.अशा सामाजिक शर्यती कराय तेव्हा सर्व मोठे राजकारणी मराठाच होते कोणाविरोधात शर्यत करायची म्हणून अण्णासाहेब पाटलांच्या बलिदानानंतर राजकारणात काहीही बदल झाला नाही,आत्महत्या कराय लावणारं सरकार पुन्हा बहुमताने निवडूण आलं.

शेवटी एक गंमत सांगतो,अण्णासाहेबांच्या बलिदानाचा सरकारी पातळीवर पहिल्यांदा सम्मान करणारा नेता हा कोणता मराठा नव्हता.शिवसेना-भाजपचं जे “हिंदुत्ववादी” सरकार होतं त्यात एक “बामन” मुख्यमंत्री होता ज्याने अण्णासाहेबांच्या नावाने मराठ्यांसाठी आर्थिक महामंडळ स्थापित केल्यालं. “मनोहर जोशी”बाकी बाहुबली मराठा नेत्यांसाठी अण्णासाहेबांचं नाव काढणं देखील बाटण्याचा विषय होता.

-विवेक मोरे

अन्य लेख

संबंधित लेख