चिंचवड : बांगलादेशातील हिंदूवर होणारे हल्ले, अत्याचार, हत्या, हिंदू मंदिरावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ तसेच तेथील अल्पसंख्यांक हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (दि. १८) विराट “हिंदू जनगर्जना मोर्चा” काढण्यात आला. विशाल मोर्चात महिला व युवतीचा सहभाग लक्षणीय होता. सकाळ हिंदू समाजाच्या वतीने चिंचवड स्टेशन ते पिंपरी दरम्यान निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते.
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक येथून रविवारी सकाळी साडेदहा वाजता या विराट मोर्चाला सुरुवात झाली. त्यामध्ये पिंपरी- चिंचवड शहरासह निगडी, चिखली, प्राधिकरण, देहू, आळंदी नगरपालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र, हिंजवडी येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, देवस्थान / मंदिर समित्या, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश मंडळे, प्रतिष्ठान यांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता.
या वेळी मोर्चेकऱ्यांनी विविध मागण्या केल्या, बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या अमानुष हत्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, सीएए कायद्यानुसार बांगलादेशामधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध यांना भारतीय नागरिकता देण्याची प्रक्रिया जलद गतीने करावी. पुण्यात किती रोहिंग्या मुसलमान घुसखोर आणि बांगलादेशी मुसलमान घुसखोर वास्तव्यास आहेत ? याचे सर्वेक्षण तातडीने करावे, तसेच त्यांना शोधून त्वरित देशाबाहेर हाकलून देण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशा मागण्या केल्या.
- ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग २
- शिवसृष्टीमुळे बारामतीला ऐतिहासिक व पर्यटन महत्त्व मिळेल, अजित पवारांचा विश्वास
- मराठा आरक्षण मोर्चाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा ‘ऑन-ग्राउंड’ पाठिंबा; आंदोलकांना केली मोठी मदत
- वोकिझम-उपभोगवाद विरुद्ध धर्म-संवादच उत्तर : डॉ. भागवत
- ‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस