Thursday, November 21, 2024

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ

Share

शेतकऱ्यांना दिलासा… रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ

रबी पिकांच्या किमान आधारभूत दरात वाढ करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यात गव्हाच्या किमान आधारभूत दरात दीडशे रुपये वाढ केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसंच बाजरी १३० रुपये, ज्वारीत १३०, हरभरा २१०, मसूर २७५, मोहरी ३००, आणि सूर्यफूलाच्या किमान आधारभूत दरात १४० रुपये वाढ करण्यात आली आहे.  शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा निर्णय घेतल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं.

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक  महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. आता हा महागाई भत्ता ५३ टक्के होईल. याचा लाभ ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४ लाख निवृत्ती वेतनाधारकांना होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं.

अन्य लेख

संबंधित लेख