२० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर पक्षांनी उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत.मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीत महाविकास आघाडी (मविआ) एकदा पुन्हा गोंधळात सापडली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असताना मविआचे २३ मतदारसंघात अद्यापही उमेदवार जाहीर झालेले नाहीत.
हे मतदारसंघ विविध कारणांमुळे चर्चेत आहेत, ज्यात एक पेक्षा जास्त उमेदवारांची इच्छा असल्याने तिढा निर्माण झाला आहे किंवा काही ठिकाणी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव दिसतो आहे.या वादळात, काही मतदारसंघांसाठी दोन पक्षांनी एकाच वेळी उमेदवार उभे केले असल्याचे चित्र पुढे आले आहे, या मुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, हे प्रकरण मविआच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
हा गोंधळ मविआतील पक्षांमधील समन्वयाच्या अभावाचा परिणाम आहे.या गोन्धळाचा फटका महाविकास आघाडी ला बसण्याची शक्यता आहे