Monday, June 24, 2024

वाराणसी मध्ये पुन्हा नरेंद्र मोदीच खासदार; तब्बल इतक्या मतांनी विजयी

Share

वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेस प्रमुख अजय राय आणि बसपा नेते अथर जमाल लारी होते. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला गड कायम राखला आहे. त्यांनी वाराणसी येथून विजयी झेंडा फडकवला आहे.

नरेंद्र मोदी यांना 6 लाख 12 हजार 970 इतकी मतं मिळाली आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अजय राय यांना 4 लाख 60 हजार 457 मतं मिळली आहेत. नरेंद्र मोदी यांनी अजय राय यांचा तब्बल 1 लाख 52 हजार 513 मनीं पराभव करत विजय मिळवला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख