Sunday, May 26, 2024

अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडून नाशिकचा उमेदवार जाहीर

Share

नाशिक : नाशिक मतदारसंघातून (Nashik Lok Sabha) शिवसेना (शिंदे गट) पक्षाने अखेर महिन्याभराच्या प्रदीर्घ चर्चेनंतर महायुतीचा उमेदवार म्हणून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकची जागा मिळावी यासाठी बराच जोर लावला होता. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ हेच निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चाही सुरू होती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा कोणाला मिळणार याबाबत सस्पेन्स कायम होता. नाशिकच्या जागेच्या अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घेतील असं महत्त्वाचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं होत.

लोकसभा निवडणूक 2024 जाहीर झाल्यापासूनच नाशिकच्या जागेबाबत महायुतीत वाद सुरू झाला होता. ही जागा आपल्यालाच मिळावी असा महायुतीतील तीनही पक्षाने दावा केला होता. अखेर आज याबाबत अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला. आता सलग तिसऱ्यांदा हेमंत गोडसे यांना खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख