Wednesday, March 18, 2026

नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चा संतापजनक प्रकार? नाव बदलून मैत्री केली, घरात घुसून बलात्कार अन् जीवे मारण्याची धमकी

Share

नाशिक/इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आपली खरी ओळख लपवून, खोटे बोलून तरुणीशी मैत्री केली आणि त्यानंतर तिच्यावर घरात घुसून बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेवर लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला असून, तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आरोपीचे नाव मुस्ताक सलीम शेख (वय २४, रा. पेठ रोड, नाशिक) असे आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, मुस्ताकसोबत तिची पूर्वीपासून ओळख होती. मात्र, त्याने सुरुवातीला आपली खरी ओळख लपवली होती. खोटे बोलून त्याने तरुणीचा विश्वास संपादन केला. २३ मार्च २०२२ रोजी आरोपीने तरुणीच्या घरात शिरून तिच्यावर जबरदस्ती केली. पीडितेने आरोप केला आहे की, तिच्यावर दोनदा अत्याचार झाला असून आरोपी तिला वारंवार मानसिक त्रास देत होता.

धर्मांतरासाठी आणि लग्नासाठी छळ

आरोपी मुस्ताक पीडितेवर लग्न करण्यासाठी आणि स्वतःचा धर्म बदलण्यासाठी सतत दबाव टाकत होता. त्याने तिला इगतपुरीतील एका मंदिरात येण्यास भाग पाडले आणि नकार दिल्यास आपल्या नातेवाईकांमार्फत तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासामुळे आणि दहशतीमुळे पीडिता अनेक दिवस गप्प होती, मात्र अखेर तिने धैर्याने पोलिसात धाव घेतली.

तरुणीच्या तक्रारीवरून इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुस्ताक शेख याला नाशिकच्या शालिमार भागातून शिताफीने अटक केली. आरोपीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इगतपुरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख