Tuesday, December 3, 2024

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचारकांची यादी जाहीर

Share

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध ठिकाणच्या जागांचे अंदाज बांधले जात आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र जोरदार सुरु आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी २७ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार नितीन पाटील, सयाजी शिंदे, आमदार अमोल मिटकरी यांचा समावेश आहे.

अन्य लेख

संबंधित लेख