Thursday, February 5, 2026

६ फेब्रुवारीला ‘परीक्षा पे चर्चा’चा खास भाग पाहण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

Share

नवी दिल्ली : परीक्षांचा हंगाम जवळ येत असताना, पंतप्रधानांनी पुन्हा एकदा ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे युवा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 6 फेब्रुवारी 2026 रोजी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताच्या तरुणांच्या एकत्रित भावनेचे आणि या संवादाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी हा विशेष भाग पहावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.

यंदाचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम अधिक व्यापक आणि संवादात्मक होता. पंतप्रधानांनी देशाच्या विविध भागांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यंदा देवमोगरा, कोइम्बतूर, रायपूर, गुवाहाटी आणि दिल्लीतील 7, लोक कल्याण मार्ग येथे एक्झाम वॉरियर्स बरोबर संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांचा उत्साह आणि मोकळेपणा याची नोंद घेत हा उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी अनुभव होता असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांनी तणावमुक्त परीक्षांचे महत्त्व अधोरेखित केले आणि आव्हानांवर मात करणे, संतुलन राखणे आणि आत्मविश्वास वाढवणे याबद्दल व्यवहार्य मार्गदर्शन केले.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना आमंत्रित करताना म्हटले की,

“परीक्षा जवळ येत असताना, #ParikshaPeCharcha देखील परत आला आहे!

यावेळी देवमोगरा, कोईम्बतूर, रायपूर, गुवाहाटी आणि दिल्लीतील 7, एलकेएम येथे #ExamWarriors बरोबर चर्चा झाली. नेहमीप्रमाणेच माझ्या युवा मित्रांशी संवाद साधणे, तणावमुक्त परीक्षा आणि इतर अनेक विषयांवर चर्चा करणे हा एक उत्साहवर्धक अनुभव होता.

6 फेब्रुवारी रोजी पीपीसी एपिसोड नक्की पहा!” असे ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख