Tuesday, December 3, 2024

“वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही” नरेंद्र मोदी

Share

महाराष्ट्र : “बाळासाहेबांचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मान सन्मान करणारच. उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. त्यांच्यावर जर कुठलं संकट उद्या आलं तर मदतीसाठी धावणारा मी पहिला व्यक्ती असेन, कुटुंब म्हणून…”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल होत. यावर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यावर ट्विट केलं आहे.

‘भाजपाचे 105 आमदार असताना, शिवसेनेला मुख्यमंत्री पद का? असे प्रश्न अनेक पण.. मा. पंतप्रधानाचे उत्तर एकच! “वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण मी विसरु शकत नाही” असं ट्विट केलं आहे. तसेच, “ज्या दिवशी कौटुंबिक दृष्ट्या श्रीमान उध्दव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा पहिला मदतीला धावून मी जाईन” याला म्हणतात..स्पष्ट, स्वच्छ आणि निर्मळ भूमिका !!’, असंही त्यांनी ट्विट मध्ये लिहिलं आहे.

दरम्यान ‘उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. जेव्हा ते आजारी होते तेव्हा मी त्यांना फोन केला होता. रश्मी वहिनींना फोन करुन मी उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करायचो. ऑपरेशन करण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता. काय करायला पाहिजे? असं मला विचारलं होतं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही ऑपरेशन करा, बाकीची चिंता सोडा. शरीराकडे लक्ष द्या’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख