Saturday, July 27, 2024

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत

Share

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल अंबाजोगाई (Ambajogai) येथे बीड लोकसभा (Beed Lok Sabha) मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.

यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या आठवणींना उजाळा दिला. “मी संत भगवान बाबा संत नारायण महाराज यांना नमन करतो. योगेश्वर देवीला प्रमाण करतो. बीडचे आमचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत हृदयाचं नातं राहिलेलं आहे. ते नेहमी मला बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत होते. तुम्ही मला 2014 मध्ये देशसेवेची जबाबदारी दिली तेव्हा मी देशभरातील गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या सहकाऱ्यांना निवडून दिल्ली घेऊन गेलो होतो, पण दुर्दैवाने काही दिवसात मला माझ्या सहकाऱ्यांना गमवावे लागलं. सुषमा स्वराज, अरुण जेटली, मनोहर पर्रीकर यांना गमावल्यानंतर माझे हात कट झाल्याची भावना निर्माण झाली. स्वाभाविक आहे मला आज गोपीनाथ जीची आठवण येत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख