Sunday, September 8, 2024

प्रसाद लाड यांचे जरांगेंना आव्हान: “न्यायाची अपेक्षा आहे, नरेटिव्हची नाही”

Share

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि भाजपा (BJP) नेते आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात वाक्ययुद्ध चांगलच रंगलय. मनोज जरांगे यांच्याकडून प्रसाद लाड यांच्यावर टीका करतांना जिभेवरचा ताबा सुटला. जरांगे म्हणाले होते कि “माझ्या नादी नको पडू, मनोज जरांगे हा जातीसाठी लढतो. जात विकून घर मोठं करणारी तुमची औलाद आहे,” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी लाड यांच्यावर केली होती. जरांगे यांच्या वक्त्यव्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर देत मनोज जरांगे यांना खुल्या चर्चेच आव्हानचं दिलय.

प्रसाद लाड यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत मनोज जरांगे यांना प्रत्युत्तर दिलंय.ते म्हणाले की “बाय द वे, मि. जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, ‘नरेटिव्ह’ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या” असे म्हणत लाड यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपाचेही खंडन केलंय.

“हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 2023-2024 चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (6 जून 2024 च्या जाहिरातीनुसार) त्यांच्याकडे 2024-25 या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले, असे ते म्हणाले.

“आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी 60 वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या! , असं आव्हान लाड यांनी मनोज जारांगेंना दिलं.

अन्य लेख

संबंधित लेख