Friday, September 13, 2024

पुणे : मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Share

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Lok Sabha constituency) महायुतीच्या वतीने मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोहोळ यावेळी पदयात्रा काढणार आहेत. त्यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 29 तारखेला पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेवाराच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. सभेपूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे उभे आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख