Monday, June 24, 2024

आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात का गेले होते? अजित पवारांनी स्पष्ट केलं

Share

पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात (Pune Porsche car accident) प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून अल्पवयीन मुलाच्या वडील, आजोबानंतर आता आईलाही पोलिसांनी अटक केलीय. तर दुसरीकडे घटनेनंतर पोलीस ठाण्यात गेलेले आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवारांकडून (Ajit Pawar) सुनील टिंगरेंची पाठराखण केलीय.

“सुनील टिंगरेंवरील आरोप बिनबुडाचे असून, टिंगरे लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले होते. सुनील टिंगरेंनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला नाही, कुणालाही पाठीशी घाला, असं टिंगरे म्हणाले नाहीत” असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. “आमदाराच्या मतदारसंघात जेव्हा कुठली घटना घडले तेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून तो तेथे जात असतो. सुनील टिंगरे देखील त्यासाठीच तेथे गेले होते,” असं म्हणत अजित पवार यांनी टिंगरेंचा बचाव केलाय.

अन्य लेख

संबंधित लेख