Sunday, July 14, 2024

पंजाबमध्ये शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला; शहीद सुखदेव सिंगांचे नातेवाईक गंभीर जखमी

Share

पंजाब : पंजाबमधील (Punjab) लुधियानामध्ये शहीद सुखदेव सिंग यांचे नातेवाईक आणि शिवसेना (Shiv Sena) नेते संदीप थापर गोरा (Sandeep Thapar Gora) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निहंगांच्या वेशात आलेल्या ३ ते ४ आरोपींनी संदीप थापर गोरा यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर संदीप थापर गोरा यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या संवेदना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंदर अरोरा यांच्या चौथ्या पुण्यतिथी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते संदीप थापर गोरा बंदुकधारीसोबत आले होते. मेळाव्यात नमन करून ते बाहेर येताच निहंगांच्या वेशातील चार तरुणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

संदीप थापर गोरा यांना रक्ताने माखलेल्या अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथून त्यांना उच्च केंद्रात पाठवण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून पोलिसांनी थापर यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पंजाबमधील लुधियाना येथील फतेहगढ साहिब येथून पोलिसांनी अटक केली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख