Thursday, October 10, 2024

राहूल गांधींनी आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम केलं : पंकजा मुंडे

Share

मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षणाच्या विरोधात केलेल्या वक्त्यव्याचा निषेधार्थ आज राज्यभरात काँग्रेस नेते खासदार राहूल गांधींच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत आशिष शेलार आणि पंकजा मुंडेंच्या (Pankaja Munde) नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. यावेळी पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, “हे आंदोलन प्रत्येकाच्या जनामनात, गल्लीबोळात सदैव सुरु राहणार आहे. जोपर्यंत काँग्रेस नेते राहूल गांधी स्पष्टीकरण देत नाहीत आणि ज्यांना आरक्षण मिळालं त्या वंचितांची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील. देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना भाजपच्या विरोधात फेक नरेटिव्ह तयार करून आणि लोकांना भूलथापा देऊन त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, आज त्यांच्या मनातलं, पोटातलं ओठात आलं आहे,” अशी टीका त्यांनी केली.

पुढे त्या म्हणाल्या की, “प्रत्येत पक्षाच्या, प्रत्येक विचाराच्या, प्रत्येत जातीधर्माच्या माणसाने देशाबाहेर आपल्या देशाची गरिमा ठेवली पाहिजे. परंतू, राहूल गांधींनी आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम केलं आहे. आपल्या देशाच्या बाहेर गेल्यावर आपण भारतीय असतो. त्यामुळे त्यांनी भारतीय संविधानाचा अवमान करायला नको होता. याबाबतीत खुलासा करायला हवा. तसेच राहूल गांधींच्या या वक्तव्याशी त्यांचे मित्रपक्ष सहमत आहेत का, याबाबतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,” असेही त्या म्हणाल्या.

अन्य लेख

संबंधित लेख