Sunday, October 13, 2024

“तुम्ही जोडे बाहेर कधी काढणार?,” राहुल गांधींच्या आरक्षण मोडीत काढण्याच्या वक्तव्यावरून शेलारांचे उद्धव ठाकरेंना टोले

Share

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षण मोडीत काढणार या वक्तव्याच्या निषेधार्थ राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत भाजप नेते आमदार आशिष शेलार आणि आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. “राहुल गांधी यांच्या वक्तव्याला संविधान विरोधी आणि आरक्षणाला मोडीत काढणार भूमिका सार्वजनिकरित्या मांडली याबद्दल आम्ही राहुल गांधी आणि काँग्रेसचा त्रिवार निषेध व्यक्त करतो,” अशी भूमिका आमदार आशिष शेलारांनी (Ashish Shelar) माध्यमांशी संवाद साधतांना स्पष्ट केली.

आशिष शेलार म्हणाले कि, राहुल गांधी यांच्या ओठांमध्ये त्यांच्या पोटातील भूमिका का आली असा सवाल सवाल यावेळी शेलारांनी उपस्थित केला. सर्वसामान्य समाजाच्या संविधानिक आरक्षण मोडीत काढण्याचा राहुल गांधी यांच्या मानस देशाने स्पष्ट मागितलं आहे आणि तो बघितला आहे. म्हणून राहू गांधी आणि काँगेसला आमचं आव्हान आहे चैत्यभूमीवर येऊन परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नाक घासून माफी मागेपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेऊ, असं ते म्हणाले. बाळासाहेब थोरात असो किंवा काँग्रेसचे अन्य कोणी नेते असतील हे आता त्याच्यावर मुलामा लावण्याचं, शब्द फिरवण्याचे कितीही काम कितीही काम करुत आरक्षणाला मोडीत काढणार आणि संविधान विरोधी वक्तव्य हे पूर्ण जगाने पाहिलं आहे, असं ते म्हणाले.

उद्धवजी, जोडो मारो आंदोलन राहुल गांधींच्या पुतळ्याचं करणार का? असा प्रश्न आमदार आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना विचारलाय. तुमचे जोडे भांडुपच्या बंगल्यावर पॉलिश करायला गेलेत का? तुम्ही ते जोडे बाहेर कधी काढणार आहात हे महाराष्ट्र आणि देश पाहू इच्छित आहे. असा सणसणीत टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

पवार साहेब आता गरीबाच्या आणि आमच्या समाजाच्या बाजूने भूमिका घेणार आहेत का? हे देश जाणू इच्छित आहे असा सवाल त्यांनी शरद पवारांना केलाय. तुम्हाला भूमीका स्पष्ट करावी लागेल राहुल गांधी आणि काँग्रेसची आरक्षण विरोधी भूमिका हि संविधानाबाबत आहे, तर तुम्ही आता तुमची भूमिका महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावी असं आव्हान शेलारांनी विरोधकांना दिलाय.

अन्य लेख

संबंधित लेख