Saturday, July 27, 2024

मोदीजी होते म्हणून… राम मंदिर उभं राहिलं, ३७० कलम हटवलं गेलं; राज ठाकरेंकडून मोदींच्या कामाचे कौतूक

Share

महाराष्ट्र : मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचं आणि केलेल्या कामांचं कौतुक केलं.

“मोदीजी तुम्ही होतात म्हणून अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम तुमच्यामुळेच हटवलं गेलं. काश्मीर भारताचा भाग आहे हे ३७० कलम घटनेनंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले”, असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

“शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदीजींनी याच पीडित मुस्लिम महिलांना ट्रिपल तलाक मधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होतोय तो अन्याय कायमचा दूर झाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन”, असेही राज ठाकरे म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख