Saturday, July 27, 2024

राज ठाकरेंनी भरसभेत व्यक्त केल्या मोदींकडून या अपेक्षा!

Share

महाराष्ट्र : मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघांचे मतदान पाचव्या टप्प्यात अर्थात २० मे रोजी पार पडणार आहे. तत्पूर्वी महायुतीची भव्य सभा शिवाजी पार्कवर पार पडली. विशेष म्हणजे मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्रित आलेले बघायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदी उपस्थित होते. यावेळी राज ठाकरेंनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या.

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासाठी काय-काय अपेक्षा व्यक्त केल्या?

१. अनेक वर्षे खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा

२. जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहास देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा. 

३. शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं

४. मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण करावे आणि मुंबई लोकलकडे विशेष लक्ष द्यावे.

५. देशांतर्गत असलेल्या देशविरोधी शक्तींना एकदाच ठेचून काढा.

६. संविधान अबाधित आहे हे पुन्हा सांगून विरोधकांची तोंडं बंद करा

७. रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करता. रेल्वे यंत्रणेवर बारीक लक्ष द्या. अधिक निधी द्या

अन्य लेख

संबंधित लेख