सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या महायुती सरकारला जनता साथ देणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर करताना केला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करत आपल्या सरकारच्या कामाचा आलेख मांडला.
स्थगिती सरकार गेल्यानंतर मागच्या सव्वा दोन वर्षांत गती आणि प्रगती सरकारचे काम जनतेने अनुभवले आहे. विरोधक एकीकडे लाडकी बहीण योजनेवर टीका करतात, सरकारकडे पैसे नाहीत, निवडणुका झाल्या की योजना बंद होणार अशा अफवा पसरवत आहेत. महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना श्री. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली.
आमच्या सरकारच्या कामगीरीमुळे विरोधक बिथरले असून खोटेनाटे बोलत, असंबद्ध बरळत आहेत अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, स्थगिती सरकार गेल्यानंतर मागच्या सव्वा दोन वर्षांत गती आणि प्रगती सरकारचे काम जनतेने अनुभवले आहे. विरोधक एकीकडे लाडकी बहीण योजनेवर टीका करतात, सरकारकडे पैसे नाहीत, निवडणुका झाल्या की योजना बंद होणार अशा अफवा पसरवत आहेत. महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना श्री. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. स्वरुपाची मोफत वीज योजना आणली आहे, असेही श्री. फडणवीस यांनी नमूद केले. सिंचनक्षेत्रात अभूतपूर्व काम करत महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर 145 प्रकल्पांना मान्यता दिली. 22 लाख 73 हजार हेक्टर सिंचनक्षमता निर्माण केली आहे. मागेल त्याला सौरपंप योजनेमुळे फक्त 10 टक्के पैसे भरून शेतक-यांना सौरपंप मिळाल्याने 25 वर्षे वीजबिल येणार नाही. वैनगंगा-मळगंगा, नार-पार-गिरणा, दमणगंगा-पिंजाळ, दमणगंगा-एकदरे असे 4 नदीजोड प्रकल्प मंजूर करण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाखांच्यावर मराठा उद्योजकांना बळ मिळाले आहे, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.