राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) एक निवेदन जारी करून बांगलादेशमध्ये (Bangladesh) गेल्या काही दिवसांत सत्ता परिवर्तनाच्या आंदोलनादरम्यान हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्याक समुदायांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संसंघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी हे वक्तव्य केले आहे.
दत्तात्रेय होसाबळे म्हणाले कि, हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांच्या महिलांवरील लक्ष्यित हत्या, लूटमार, जाळपोळ आणि जघन्य गुन्हे आणि बांगलादेशातील हिंदू मंदिरांवरील हल्ले अश्या प्रकारची क्रूरता असह्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याचा तीव्र शबदात निषेध केला आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अशा घटना ताबडतोब थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. तसेच, सरकारने पीडितांच्या जीविताचे, मालमत्तेचे आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे. आम्ही जागतिक समुदायाला आणि भारतातील सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की, या कठीण काळात हिंदू, बौद्ध इत्यादी छळ झालेल्या समुदायांसोबत एकजुटीने उभे राहावे.
बांगलादेशच्या परिस्थितीत शेजारी मित्र देश म्हणून योग्य भूमिका बजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारत सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशातील हिंदू, बौद्ध इत्यादी लोकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे.
- रक्ताच्या थारोळ्यातून राज्यसभेपर्यंत: सदानंदन मास्तरांची अदम्य संघर्षगाथा
- चीनचा विरोध, भारताचा स्वीकार: दलाई लामा नावाचे पर्व
- बनावट आणि निकृष्ट खतांच्या विक्रीवर येणार चाप; शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्र्यांना कारवाईचे आदेश!
- ‘गेम चेंजर’ मिसिंग लिंक प्रकल्प: मुंबई-पुणे प्रवासासाठी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’!
- हिंजवडी आयटी पार्क व मेट्रो कामाची अजित पवारांकडून पाहणी; कडक इशारा देत तात्काळ कारवाईचे आदेश!