Saturday, September 7, 2024

संजय राऊत यांना मोदींबद्दलच ‘ते’ वक्तव्य भोवलं; गुन्हा दाखल

Share

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांच्या विरोधात अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी औरंगाजेबाच्या जन्मस्थळाचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी 8 मे रोजी अहमदनगर मध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी मोदी यांचा एकेरी उल्लेख केला होता. दोन गुजराती लोकांना महाराष्ट्राबद्दल राग आहे. ते  सुडाचं राजकारण करत आहेत असं राऊत म्हणाले होते. 

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले होते की, आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला होता तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबाचा जन्म आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म दावत मध्ये झाला आहे. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण?”

अन्य लेख

संबंधित लेख